![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
मेळाव्याला श्री पटेलांचे उत्स्फूर्तपणे जंगी स्वागत
आज राष्ट्रवादीचा एकच ध्यास वर्धा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास संकल्पनेतून, दादाजी धुनिवाले सभागृह वर्धा येथे आयोजित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा परिवर्तन मेळावा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष तथा खासदार श्री प्रफुल पटेल, माजी मंत्री श्री सुबोध मोहिते, युवक प्रदेश अध्यक्ष श्री सूरज चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. 2 महिन्यापूर्वी जो निर्णय घेण्यात आला तो सर्वसामान्य जनेतच्या सर्वांगीण विकासाची भूमिका घेऊनच योग्य निर्णय घेण्यात आला असे मेळाव्याला संबोधित करताना श्री पटेल बोलत होते.
यावेळी बोलताना श्री प्रफुल पटेल यांनी सत्तेत सहभागी होण्याची भूमिका मांडली. ४३ आमदारांचे लाभलेले बळ, पक्षाची मान्यता व चिन्ह अबाधित राहील, अशी ग्वाही देत मनातील किंतु-परंतु दूर करण्याचे आवाहन कार्यकत्यांना केले. आपल्या पक्षाला आतापर्यंत कसे दुय्यम स्थान मिळत गेले, याचाही उल्लेख त्यांनी केला. शिवसेनेचे ५६ आणि आपले ५४ होते. याआधारे अडीच नाही तर किमान दोन वर्षे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद अपेक्षित होते. त्यावेळी मात्र कुणीही यावर बोलले नाही. राष्ट्रवादीला अनेकवेळा संधी आली. मात्र प्रत्येकवेळी आपण संधी गमावली. काँग्रेसने सुरुवातीपासून झुकते माप घेतले व आपल्याला ठराविक झागा दिल्या. प्रत्येकवेळी आम्ही माघार घ्यायची का, पहिल्या क्रमांकावर येण्याची आशा बाळगायची नाही का’, असे सवाल करून ‘भाजपकडून पूर्ण न्याय मिळणार आहे. यापुढे आपला पक्ष अधिक बळकट करू’ असे प्रतिपादन श्री पटेल यांनी केले.
श्री पटेल पुढे म्हणाले की, ‘पक्षाचे नाव, चिन्ह मिळेल की नाही, याची चिंता करू नका. आपल्यासोबत ४३ आमदार आहेत आणखी येतील. बहुसंख्य कार्यकर्ते सोबत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग योग्य निर्णय घेईल’, असे पटेल म्हणाले. यावेळी कार्यकर्त्यांनी वर्धा जिल्ह्यात परिवर्तन मेळाव्याच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस चा विस्तार व अधिक बळकट करण्याची ग्वाही दिली.
मेळाव्याला खासदार श्री प्रफुल पटेल यांच्यासोबत श्री सुबोध मोहिते, श्री सुरज चव्हाण, श्री ईश्वर बाळबुधे, श्री प्रशांत पवार, श्री बाबा गुजर, मेधाताई पवार, श्री पुंडलिक पांडे, श्री शरद सहारे, श्री आशिष ठाकरे, श्री मयूर डफके, श्री रोशन तेलंग, क्रांतीताई धोटे, श्री दिलीप पोटफोडे, श्री उज्वल काशीकर सहीत असंख्य पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ता व पत्रकार बंधू उपस्थित होते.