
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
चार पर्यटनस्थळाच्या विकासासाठी २.८कोटीचा निधी – राज्य शासनाचे कार्यारंभाचे आदेश
गोंदिया : पर्यटन विकासातून जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा व पर्यटनस्थळाकडे लोकांचा ओघ वाढावा या दृष्टीकोनातून खासदार प्रफुल पटेल यांनी पर्यटन विकासाकडे लक्ष वेधले. वर्षभरापूर्वी सूचविलेल्या ७.७० कोटी पर्यटन विकासाची कामे मंजूर करण्यात आली. मात्र ती कामे थांबविण्यात आली होती. या संदर्भात खा. प्रफुल पटेल यांनी पाठपुरावा केल्याने त्या थांबविलेल्या कामांना निधी उपलब्ध करून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने पुन्हा कार्यारंभाचे आदेश दिले. जिल्ह्यातील नवेगाव बांध,चोरखमारा, प्रतापगड, बोदकसा या चार पर्यटनस्थळाच्या विकसासाठी २ कोटी ७७ लाखाची निधी मंजूर करण्यात आली आहे. यामुळे पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. उल्लेखनीय असे की गोंदिया जिल्ह्याच्या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी मजी अंदर राजेंद्र जैन यांनी खासदार प्रफुल पटेल यांचे लक्ष वेधले होते.
जिल्ह्यातील पर्यटनस्थळ विकसित व्हावे यासाठी खा. प्रफुल पटेल हे सतत प्रयत्नरत राहतात. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये गोंदिया जिल्ह्यातील पर्यटन स्थळाचा विकास कामे प्रस्ताविक करण्यात आले. त्या कामांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आली होती. मात्र, कार्यारंभा पूर्वीच राज्य सरकारने मंजूर कामांना थांबविण्याचा निर्णय घेतला त्यामुळे विकास कामे रखडली. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष राज्य सरकारात सहभागी होताच विकास कामांना गती देण्याचे काम सुरु केले. थांबविलेल्या कामांना पुन्हा कार्यारंभाचा आदेश देण्यात यावे यासाठी खा. प्रफुल पटेल यांनी संबंधित विभागाशी सतत पाठपुरावा केला. परिणामी राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागने ८ सप्टेंबर रोजी शासन निर्णरू निर्गमित करून सन २०२१-२२मध्ये थांबविलेल्या पर्यटन विकासाच्या कामांवरील स्थगिती स्थगिती उठवून पुन्हा कार्यारंभ करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अंदाजे रकमे पैकी काही हिस्स्याची निधीही कामांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध, प्रतापगड,चोरखमारा व बोदलकसा या चार पर्यटनस्थळाच्या विकासासाठी २ कोटी ७७ लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या मंजूर कामांना ३१ मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहे. खा. प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने गोंदिया जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी खा. प्रफुल पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन यांचे आभार मानले आहे.
चार पर्यटनस्थळी ६० विकास कामांना मंजूरी
खा. प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील चार पर्यटनस्थळाच्या विकासासाठी ७७० लाख रुपयांचे अंदाजित कामे राज्य शासनाकडे प्रस्तावित करण्यात आले. त्यापैकी राज्य शासनाने २ कोटी ७६ लाख रुपयाचा निधी पर्यटन विकासा अंतर्गत जिल्ह्यातील नवेगावबांध, प्रतापगड, चोरखमारा व बोदलकसा या चार स्थळाच्या विकासासाठी मंजूर केला आहे. यामध्ये नवेगावबांध पर्यटनस्थळाच्या १२ कामांसाठी ५४ लाख, प्रतापगडच्या १७ कामांसाठी ६१ लाख, चोरखमाराच्या १६ कामांसाठी ८४ लाख व बोदलकस्याच्या १५ कामांसाठी ७८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.





Total Users : 883090
Total views : 6488524
