![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
लातूर :- द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून राठोड रमेश पंडित यांची लातूर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाली असून,हि निवड पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख अन्सार बाबासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
तसेच या पत्रकार संघांमध्ये काम करण्याची संधी मिळाली , छोट्याशा खेड्यामधून पत्रकारितेची सुरुवात करताना खंडाळी सर्कल प्रतिनिधी म्हणून काम करता करता तालुका प्रतिनिधी म्हणून त्यांची पदोन्नती करण्यात आली . आणि काही कार्यकाळामध्ये दैनिक जनतेचे मत या वृत्तपत्रात कार्यकारी संपादक म्हणून काम करत आहेत त्यांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेक गोर गरिबांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून दिले आहे . तसेच या निवडीचे औचित्य साधून सर्व मित्रपरिवारकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांचा आर्शिवाद त्यांच्या कायम पाठीशी असल्याचे मत मित्रपरिवार आणि हिताचींकानी मांडले
तसेच पत्रकार संघाच्या माध्यमातून लातूर जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या .