



प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
????भंडारा: नियोजित कार्यक्रमासाठी ते आपल्या सहकाऱ्यांसह निघाले होते. वाटेत अपघात होऊन रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेले एक कुटुंब दिसले. क्षणाही विलंब न करता त्यांनी गाड्यांचा ताफा थांबवून जखमींकडे धाव घेतली. तत्काळ स्वतःच्या गाडीत जखमींना टाकून रुग्णालय गाठले आणि उपचाराला सुरुवात केली. आज सवृदयी खासदारांमुळे वेळेत उपचार मिळाल्याने महिलेचे प्राण वाचले. पुन्हा एकदा खासदार सुनील मेंढे यांच्यातील हळव्या माणसाचे दर्शन घडले.
जखमींची पुरेपूर काळजी घेऊन आणि त्यांच्या औषधोपचाराची व्यवस्था त्यांनी केली. आजही राजकीय नेत्यांमध्ये आपुलकी आणि सामान्यांप्रती जिव्हाळा शिल्लक असल्याचे खासदारांच्या या कृतीतून उघड झाले. खासदारांनी दाखवलेल्या या तत्परतेची चर्चा मात्र सर्वत्र आहे.