
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
तुमसर तालुक्यातील विविध समस्यांचा आढावा घेऊन, प्रकरणांचा निपटारा करण्याकरीता तुमसर येथे दि. २५ सप्टेंबर २०२३ रोजी ११ वाजता आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय, पंचायत समिती, कृषी विभाग, बांधकाम विभाग, भूमी अभिलेख कार्यालय, नगरपरिषद, आरोग्य विभाग, विद्युत विभाग, वनविभाग, पोलीस विभाग, पेंच / बावनथडी प्रकल्प, लघु पाटबंधारे विभाग व इतर शासकीय कार्यालयातील जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी तसेच तुमसर तालुक्यातील विकास कामाचे नियोजन, शासकीय विभागातील योजनांचा आढावा घेऊन जनसामान्याचे प्रश्न निकाली काढण्याच्या उद्देशाने सोमवार दि. २५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता तहसिल कार्यालय, तुमसर येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आलेले असून शासकीय विभागाचे सर्व संबंधित अधिकारी जनता दरबारात उपस्थित राहणार आहेत.आपण मोठ्या संख्येने जनता दरबारात उपस्थित राहावे.
टिप:- कृपया आपली समस्या लिखित स्वरुपात आणावे.





Total Users : 883092
Total views : 6488527
