



तुमसर :–केंद्रशासनाच्या “माझी माती माझा देश” व इंडियन स्वच्छता लीग २.० अभियानातर्गत १८ सप्टेंबर रोजी तुमसर नगरपरिषदेच्या वतीने शहरातून अमृत कलश यात्रा काढण्यात आली. शहरात काढलेल्या या अमृत कलश यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवअंतर्गत ‘माझी माती माझा देश ’ या अभियानाचा दुसरा टप्पा असलेल्या या उपक्रमाचा प्रारंभ येथील नगरपरिषद प्रशासकीय इमारतीच्या परिसरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सिद्धार्थ मेश्राम यांच्या हस्ते झाला.ही अमृत कलश यात्रा ढोलताशाच्या गजरात नगरपरिषद कार्यालय पासून शहरातील नगरपरिषद मालवीय शाळा,संत रविदास वॉर्ड,शहर मोहल्ला,सुभाष चौक,तहसील ऑफिस,गौतम नगर,कुंभारे नगर,आंबेडकर नगर,गांधीसागर तलाव,शास्त्री वॉर्ड,अतिथी सभागृह,बावनकर चौक ते नगरपरिषद पर्यंत समारोप करण्यात आले या यात्रेत प्रत्येक कुटुंबांनी अमृत कलशामध्ये मुठभर माती व मूठभर तांदुळ गोळा करुन आपले योगदान दिले.सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी जय जवान जय किसान, भारत माता की जय, वंदे मातरम असे नारे देत देशाप्रती प्रेम व निष्ठा व्यक्त केली. या यात्रेद्वारे ‘माझी माती माझा देश’ अभियानाचा समारोप झाला.यावेळी यात्रेत नगरपालिकेचे सर्व विभागप्रमुख कर्मचारी,स्वच्छता निरीक्षक ,सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक गण व मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.
‘माझी माती माझा देश’ हे सर्व भारतीयांसाठी महत्त्वाचे अभियान आहे.या अभियानाचा मुख्य उद्देश देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे, शूरवीरांचे स्मरण करणे हा आहे. ‘माझी माती माझा देश’ हे वाक्य म्हणजे आपल्या जन्मभूमीच्या अभिमानाच्या उत्कृष्ट आदर्शाचे स्मृतिचिन्ह आहे.
–सिद्धार्थ मेश्राम मुख्यधिकारी तथा प्रशासक नगर परिषद तुमसर