



प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
नारी शक्ती वंदन विधेयक म्हणजेच महिला विधेयकाच्या मंजुरीच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरलेले खा.सुनील मेंढे यांचा आज गोंदिया व तिरोडा जिल्हा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
महिला विधेयकाच्या मंजुरीसाठी आमच्या खासदारांचे मत पडले, हा आमच्यासाठी गौरवाचा विषय असल्याचे मत यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. भाजपा हा महिलांचा सन्मान करणारा पक्ष आहे, असे सांगून महिला सक्षमीकरणासाठी हे विधेयक महत्वाचे पाऊल असल्याचे खा. सुनील मेंढे यांनी यावेळी बोलताना सांगितले.