![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
महिला व बालकल्याण विभाग , जि.प.गोंदिया अंतर्गत महिला व बालकल्याण समिती, जि.प.गोंदियाच्या माध्यमातून *महिला /मुलींसाठी* सन 2023 -24 साठी खालीलप्रमाणे *वैयक्तिक लाभाच्या योजना* राबविण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील ईच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या नजिकच्या अंगणवाडी केंद्रात सोबत देण्यात येत असलेल्या अर्ज नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज प्रस्ताव तातडीने सादर करावेत. अधिक माहितीसाठी तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण ) , एकात्मिक बाल विकास सेवा योजना (I.C.D.S.) या कार्यालयाशी संपर्क करावेत. *राबविण्यात येणाऱ्या योजना खालीलप्रमाणे आहेत.* *1)* *संगणक प्रशिक्षण योजना* :- अर्जदार लाभार्थी अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा. शैक्षणिक अहर्ता किमान ईयत्ता 7 ते 12 वी उत्तीर्ण असावी. आर्थिकदृष्ट्या कमकुवत अपंग लाभार्थींना जातीचे बंधन नसून कोणत्याही जातीचा चालेल. *2)* *सौर कंदील योजना :-* अर्जदार लाभार्थी अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा. आर्थिकदृष्ट्या कमकुवत अपंग लाभार्थींना जातीचे बंधन नसून कोणत्याही जातीचा चालेल. *3)* *भरतीपुर्व स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण योजना :-* अर्जदार लाभार्थी अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा. शैक्षणिक अहर्ता किमान ईयत्ता 12 उत्तीर्ण असावी. आर्थिकदृष्ट्या कमकुवत अपंग लाभार्थींना जातीचे बंधन नसून कोणत्याही जातीचा चालेल. *4)* *पिठ गिरणी योजना:-* अर्जदार लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा. आर्थिकदृष्ट्या कमकुवत अपंग लाभार्थींना जातीचे बंधन नसून कोणत्याही जातीचा चालेल. *5)* *पिको फाँल शिलाई मशीन योजना:-* अर्जदार लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा. अर्जदाराजवळ पिको फाँल शिलाई मशीनचा शासकीय मान्यताप्राप्त संस्थेचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत अपंग लाभार्थींना जातीचे बंधन नसून कोणत्याही जातीचा चालेल. ???????? *-:निवेदक:-* ???????? श्री तिर्थराज ते. उके, विस्तार अधिकारी (सांख्यिकी), एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प- गोंदिया 01 , पं.स.गोंदिया जि.गोंदिया. ( मोबाईल नं.- 9689211025)