
प्रतिनिधि तुमसर: भारत देशातील केंद्र स्थानी आणि महाराष्ट्र राज्यातील सत्ता स्थानी मागील दशकापासून सत्ता उपभोगीत असलेले, भाजप आणि तत्सम मित्र पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी गण हो.
इतके वर्ष सत्ता चालवीत असतांना जे करायचे होते ते करता नाही आले म्हणून, आज ओबीसी जागर नावाचा गाजर हातात आला का?
की सामान्य जनता ती ओबीसी असो वा इतर कोणत्याही समाजाची(मी भारतीय म्हणेल)आता जागृत झाली आहे, एकमेकांना शिव्या शाप द्यायच्या, आणि निवडून आल्यावर सत्येच्या हपापलेपणा पाई अभद्र युती करायची. ही कुठली नैतिकता? आणि आता मतदारांमध्ये जागरूकता दिसून आल्यावर आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी ओबीसी आणि ओबीसींचा जागर झालं सम्पलं आता तुमचं शब्दाचं आणि वागण्याचं राजकारण आज ची जनता सर्व जाणते आहे.
या जागर च्या नावाखाली शासकीय आणि सामान्य जनतेच्या पैशाचा दुरुपयोग सुरू असून तो तात्काळ थांबविण्यात यावा। अचानक कशी काय ओबीसी विभागाच्या मंत्र्यांना जाग आली.सरकारी यंत्रणा वापरून सरकारी पैशा खर्च करून ओबीसी जागर करण्याची. ह्यावर खर्च होणारा पैसा खूप साऱ्या आवश्यक कामावर खर्च करण्यात आला असता, पण नाही भाजप ला फक्त प्रचार करायचा आहे न. जनता याचा मतदानात नक्कीच बदला घेतल्याशिवाय राहनार नाही हे विशेष..





Total Users : 883245
Total views : 6488719
