
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनी भाजपा तालुका सडक अर्जुनी चा उपक्रम
प्रतिनिधी / सडक अर्जुनी : देशाचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने संपूर्ण देशात सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टी सडक अर्जुनी तालुक्याच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते. जयंतीच्या निमित्ताने महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले.
दरम्यान भंडारा गोंदिया जिल्हा समन्वयक बाळाभाऊ अंजनकर सर, प्रदेश महिला मोर्चा सदस्या रचनाताई गहाणे, तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांतजी धानगाये, जिल्हा परिषद सदस्य डॉ. भुमेश्र्वरजी पटले, जि.प. सदस्या कविताताई रंगारी, जि.प. सदस्या निशाताई तोडासे, पंचायत समिती सभापती संगीताताई खोब्रागडे, पंचायत समिती उपसभापती शालींदरजी कापगते, पंचायत समिती सदस्य चेतनजी वळगाये, शिशिरजी येळे, तुकाभाऊ राणे, विनोदजी बारसागडे, डीलेशजी सोनटक्के, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष पद्माताई परतेकी, शीलाताई चौहाण, रंजनाताई भोई, प्रतिभाताई भेंडारकर, रुपालीताई टेंभुर्णे, रंजनाताई गोबाडे व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते





Total Users : 883242
Total views : 6488715
