![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा तुमसर तालुक्यातील मौजा. माडगी येथे पितृपक्ष अमावस्येच्या शुभपर्वावर आज कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत जिल्ह्यातीलच नव्हे तर नागपूर जिल्ह्यातील तसेच इतर भागातील कुस्तीपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला.या स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांच्या शुभहस्ते पार पडला. कुस्ती मंडळातर्फे शाल-श्रीफळ देऊन आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांचे स्वागत करण्यात आले. मैदानी खेळाच्या माध्यमातून उत्कृष्ट खेळाडू घडत आहेत.एवढेच नव्हे तर खेळाच्या माध्यमातून अनेकांनी उंच भरारी घेत शिखर गाठले आहे. ग्रामीण भागात शेती व्यवसायासोबतच खेळाला अनन्यग्रामीण भागात शेती व्यवसायासोबतच खेळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. कुस्ती हा मैदानी खेळ खेळुन स्पर्धकांचा शरीर सुदृढ़ आणि बलवान व निरोगी राहतो. या डिजीटल च्या काळात मैदानी खेळ लोप पावतांना दिसताहेत परंतु कुस्ती हा मैदानी खेळ खेळुन स्पर्धकांचा शरीर सुदृढ़ आणि बलवान व निरोगी राहतो. प्रत्येकांनी मैदानी खेळ खेळायला पाहीजे असे प्रतिपादन आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांनी या वेळी केले. कुस्ती स्पर्धकांना प्रोत्साम्पल बक्षीस आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांच्या शुभहस्ते देण्यात आले. यावेळी आयोजक के.के. पंचबुद्धेजी, श्री. रितेशजी वासनिक सभापती, पंचायत समिती मोहाडी आणि मोठ्या संख्येने नागरिक, प्रेक्षकवर्ग उपस्थित होते.