![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
माजी आ.संजय पुराम यांनी रस्ता अपघात मृत्युमुखी झालेल्या बिसेन कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट
प्रतिनिधी/आमगाव: आमगांव तालुक्यातील ठाना-गोरठा रोड वर पोकीटोला(टेकरी ) येथील भाजपा कार्यकर्त्ता श्री.ब्रिजलालजी बिसेन यांची पत्नी व सूरजलाल बिसेन यांची पत्नी व मुलगा दीपक यांचा रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबाला माजी आ.संजय पुराम यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. मृतकाच्या परीजनांना सांत्वना देत माजी आ.संजय पुराम यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. अचानक झालेल्या अपघातात बिसेन कुटुंबातील दाम्पत्य सह मुलगा मृत्युमुखी पडल्याने त्यांच्यावर दुखाचा डोंगर पडला असून त्यांना शासनाकडून आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करणार अशीही ग्वाही माजी आ.संजय पुराम यांनी दिली आहे. यावेळी माजी आ.संजय पुराम, भाजपा तालुका अध्यक्ष राजूजी पटले, विधि व न्याय अध्यक्ष एड.एस. डी.बागड़े सर, श्यामलालजी दोनोड़े, एड. आर.ट. हरिनखेडे, सरपंच अनिलजी कटरे, माजी सरपंच कैलाशजी बिसेन, माजी सरपंच शोभा ताई मेश्राम (गिरोला) उपस्थित होते.