![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
उपसंपादक / राठोड रमेश पंडित
संभाजीनगर:- छत्रपती संभाजीनगर येथील पुंडलीकनगर पोलीस स्टेशनला नव्यानेच रूजू झालेले पोलीस निरिक्षक श्री राजेश यादव यांचा दि.२०/१०/२०२३ रोजी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था प्रणित जय संघर्ष संघटनेच्या वतीने शाल व पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तसेच हातावर पोट आसून देखील संस्थेतील वाहन चालक प्रवासातील प्रवाशांना,आपघात ग्रस्तांना तसेत पोलीस प्रशासनाला देखील कशा प्रकारे मदती करतात त्या बद्दल माहिती देण्यात आली.
किन्ही टोल ना का(कोल्हापुर) तसेच हादगाव जि.नांदेड येथील पूरात अडकलेल्या वाहन चालकांना व प्रवाशांना पिण्याच्या पाण्या पासून ते चहा नाष्ट्या पर्यंत तशेंच किराणा सामाना पासून शालेय साहित्या पर्यंत चालकांनी स्व: खर्चातून केलेल्या मदती बाबत माहिती दिली.
कोरानाच्या काळा मधे जवळचा नातेवाइक दूर जात आसतांना जय संघर्ष संस्थेच्या वाहन चालक मालकांनी मात्र रात्री दहा ते पहाटे पाच पर्यंत रूग्णांना दिलेल्या मोफत सेवे बाबत ऐकूण श्री राजेश यादव साहेब संस्थेच्या कार्यावर फारच खुष झाले आणि श्री संजय हळनोर यांनी दिलेल्या निवेदनाचा स्वीकार करूण दोषीवर आवश्यक ती कार्यवाही निश्चित केली जाईल आसे आश्वासन देण्यात आले.तसेच साहेबांनी सत्काराचा स्वीकार करूण वाहन चालकांच्या कार्याचे कौतुक करूण पुढिल कार्यास शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हळनोर,उपा़ध्यक्ष संतोष काळवणे,उपाध्यक्ष सोमनाथ गायकवाड,रविंद्र उर्फ बंडू आढाव,अब्बास खान,सागरसिंग राजपुत,सुरेश मामा गायकवाड(सर्व कोअर कमिटी मेंबर्स आहेत)तसेच सुनिल आप्पा लिंगायत जिल्हा उपा़ध्यक्ष ,संजय नलावडे जि.सचिव छत्रपती संभाजीनगर तसेच सदस्य अनिल मते व नारायण माळकर ,इत्यांदीची उपस्थीती होती.