
शित -शव पेटी भंगार अवस्तेत असल्याने सामान्य नागरिकांना करावी लागत आहे कसरत
तुमसर:- तुमसर शहरात कोणत्याही परिवारत मृत्यू झाला,आनी त्या परिवारतील काहि नागरिक बाहेरगावी राहनारी असली तर अशा पारिस्थितित मृतदेह काहीं काळ ठेवन्यासाठी शव पेटिची गरज भासत असते.सदया स्थितित मृतदेह ठेवण्यासाठी सहायक ठरलेल्या शित-शव पेटी नगर परिषदेत दुरुस्तीअभावी अनेक महिन्यांपासून भंगार अवस्तेत पडलेली आहे त्यामुळे तुमसर येथील नागरिकांमधे रोष पसरलेला आहे.
नागपुर, पुणे सारख्या मोठ्या शहरांमधे मृतदेह ठेवण्याकरिता अनेक सामाजिक संस्था मार्फत शित- शव पेटीची सुविधा आहे.त्यामुळे दूर राहणारया नातेवाहिकाना अंत्यदर्शन घेता येतात त्यासाठी त्यांच्याकडून काही मेंटेनन्स चार्ज सुद्धा आकारण्यात येत असते त्यामुळे संबंधित नागरिकांची मोठी सोय होत असून याच्या संबंध भावनेशीही जुळला असतो सध्या स्थितीत तुमसर शहरात अशी सोय असूनही मृतदेह नातेवाईकांना अंतिम दर्शनाकरिता ठेवता येत नाही ही तुमसर नगर वासियांसाठी शोकांतिका आहे.
काही दिवसा पूर्वी तुमसर येथील गौतम नगर येथे एका सामान्य परिवारामध्ये सायंकाळी मृत्यू झालं होत व परिवारातील नातेवाहिक बाहेर गावी राहत असल्यामुळे अंतिम संस्कार दुसऱ्या दिवशी सकाळी करायचे होते अशा अवस्थेत मृतदेह ठेवण्याकरिता शित-शव पेटीची गरज होती, परंतु तुमसर येथे शित-शव पेटी उपलब्ध नसल्यामुळे ती मोहाडीवरुन आणावी लागली.या संबंधित माहिती मृतक कुटुंबातील नागरिकांनी इंजि.सागर गभने यांना दिली यावर त्यांनी सिद्धार्थ मेश्राम,मुख्याधिकारी नगरपरिषद तुमसर यांच्याशी भेट घेतली व लवकरात लवकर शित-शव पेटी दुरुस्ती करून मोक्षधाम समिती जे गेल्या कित्येक वर्षांपासून मृतक कुटुंबीयांना मदत करताना दिसत आहे अशा या सामाजिक संस्थेकडे सोपवण्यात यावी, संस्थामार्फत एक साधारण(200रु ते 300रु )शुल्क आकारून शव पेटीच जेणे करून मेंटेनन्स करता येईल या मुळे तुमसर येथील सामान्य नागरिकांना फटका बसणार नाही अशी मागणी राजमुद्रा ग्रुपचे संस्थापक/अध्यक्ष इंजि.सागर गभने यांच्याकडून निवेदनातून करण्यात आली.
यावर शित- शव पेटी लवकरात लवकर दुरुस्ती करून सेवा भावाच्या उद्देशाने सामाजिक संस्थेला सोपवण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी दिली आहे.या वेळी राजमुद्रा ग्रुप चे मिराताई भट, विजयाताई चोपकर, मीनलताई निमजे, इंजी. सागर गभने, शुभम बाणासुरे, राहुल रणदिवे,अर्पित जायस्वाल,फिरोज शेख,बापु लांजेवार,नितेश बडवाईक,राकेश कनोजे,सोहेल शेख, भावेश पाल उपस्तिथ होते.





Total Users : 883054
Total views : 6488485
