![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
उपसंपादक / राठोड रमेश पंडित
संभाजीनगर:- खोटी एन. सी. आर रद्द करून संबंधितांवर योग्य ते कार्यवाही करा किंवा अमरण उपोषणास परवानगी द्या.अशा आशयाच्या लेखी निवेदना ध्दारे श्री हाळनोर यांनी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना कळवलेले आहे.त्या विषयीचा सविस्तर वृतांत त्यांच्याच शब्दात.
मी संजय माणिकराव हाळनोर वय वर्ष ५२ रा.न्यू गणेशनगर छत्रपती संभाजीनगर.माझे शालेय शिक्षण ता.गेवराई जि.बीड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता दहावी पर्यंत झालेले आसून माझे संपूर्ण कुटुंबिय अशिक्षीत होते.तसेच माझ्या कुटूंबियाला कुठलाच राजकिय वारसा नाहि.केवळ कर्म धर्म संयोगाने न कळत माझ्या हातून असे काहि अभूतपूर्व कार्य घडून गेले आहे की त्याची कल्पना मी माझ्या स्वप्नात देखील केलेली नव्हती आणि असे हि काहि होऊ शकते यावर विचार देखील केलेला नव्हता.
आणि आज माझ्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या मदतीच्या यज्ञा मुळे संपूर्ण महाराष्ट्रातच नाहि तर हळूहळू संपूर्ण देशातील प्रवासातील प्रवासी व वाहन चालकांना त्याचा फायदा होताना दिसतो आहे.अनेक आपघात ग्रस्तांना वेळीच मदत मीळाल्या मुळे अनेकांचे प्राण वाचतांना दिसत असून त्याच अनुषंघाने आज पर्यंत आमच्या संस्थेला समाज माध्यमातून जवळपास 22 पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे.तसेच १० जून 2023 मधे आपल्या देशाचे परिवहन मंत्री श्री नितिनजी गडकरी साहेब यांचे हस्ते मला सन्मानीत करण्यात येऊन गौरव चिन्ह देण्यात आलेले आहे.
या मागील मुख्य कारण असे आहे की पूर्वी रोडवर जर कोणाची गाडी नादुरूस्त झाली किंवा छोटा,मोठा आपघात झाला तर विनंती करूण देखील कोणी कोणाच्या मदतीसाठी थांबत नव्हते.परंतु मी व्हाटसअपच्या माध्यमातून गावो गावीचे व्हाटसअप ग्रुप तैयार करूण त्यांना मदतीचे महत्व पटवून देऊन त्यांना प्रोत्साहीत केले.परिणामी आज घडीला सण-वार असो की रात्र असो,आपघात असो की गाडी ब्रेक डाउन असो सर्वांना सर्वत्र ठिकाणी एक दुसर्या कडून मदती होत आहेत आणि याच कार्यासाठी आज घडीला देश भरातून अनेक संस्था, संघटना आप आपल्या परिने योगदान देतांना दिसत आहेत.परंतु फक्त माझ्याच मधून बाहेर पडलेल्या विघ्नसंतोषी लोकांनी माझी समाजात बदनामी होईल आसा मजकूर फेसबुकवर सेअर करणे,मला व्हाटसअप ग्रुपला जोडून इतर सदस्यां समक्ष माझ्यावर आर्थिक भ्रष्टाचारचे आरोप करणे,माझ्या परिवारातील महिला बाबत बदनामी कारक मजकूर लिहिणे,अर्वाच्य शिवीगाळ करणे असे उद्देग चालू केलेले आहेत.
आता तर चक्क माझ्या विरूध्द पोलीसात खोट्या तक्रारी दाखल करूण मला अधीकचा त्रास देणे चालू केलेले आहे.
दि.14/9/2023 रोजी प्रशांत देशमुख नामक व्यक्तीस मी माझ्या मोबाईल नंबरवर वरूण त्याच्या मोबाईल नंबरवर व्हाटसअपच्या माध्यमातून चैटिंग ध्दारे शिवीगाळ केली आशा आशयाची त्याने मुकुंदवाडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती.परंतु तपास अधिकारी श्री अर्जुन पवार साहेबांनी सदरच्या तक्रारी बाबत किंवा पुराव्या बाबत कसलीच शहानिशा न करता दि.22 सप्टेंबर 2023 रोजी मला मुकुंदवाडी पोलीस स्टेशनला बोलावून घेऊन माझ्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही केली.त्या अनुषंघाने मी दि.26 सप्टेंबर 2023 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे लेखी निवेदन देऊन सदरील तक्रारी बाबतची शहानिशा करूण दोषीवर कार्यवाही करण्याची मागणी केली होती.
उपरोक्त तक्रारी बाबत मी दि.3 आक्टोंबर 2023 रोजी तपास अधिकारी श्री अर्जुन पवार साहेबांना माहिती देण्याची विनंती केली आसता श्री पवार साहेबांनी फिर्यादी प्रशांत देशमुख व मला दि.4 आक्टोंबर 2023 रोजी मुकुंदवाडी पोलीस स्टेशनला बोलावून घेऊन पोलीस निरिक्षक श्री तावरे साहेब यांचे समक्ष आमच्या दोघांचे पण मोबाईल तपासले आसता मी माझ्या मोबाईल वरूण प्रशांत देशमुख याचे मोबाईलवर कसल्याही प्रकारची चैटिंग केल्याचे आढळून आलेले नाहि.करीता माझी आपणास विनंती आहे की संबंधीतांनी किंवा त्यांच्या इतर साथीदारांनी भविष्यात माझ्यावर आशा खोट्या केसेस करूण मला त्रास देऊ नये करीता प्रशांत देशमुख याचेवर कडक कारवाई करण माझ्या विरूध्द केलेली प्रतिबंधात्मक कार्यवाही रद्द करण्यात यावी.
तत्पूर्वी प्रशांत देशमुख नामक व्यक्तीने जूलै 2017 मधे त्याच्या अन्य साथीदारांसह माझ्या संघटनेचा लोगों फाडून विटंबना केली होती व संघर्ष हि संघटना आज केवळ अध्यक्षा मुळे संपली असे व्हिडीयो ध्दारे सर्व सोसल मिडियावर जाहिर केले होते.परंतु पुढे माझेच संघर्ष वाहन चालक मालक संघटना हे नाव रजिस्ट्रेशन करूण माझाच लोगों देखील रजिस्टर केला.परंतु मूर्खांच्या नादी लागून आपला वेळ खर्ची घालण्या पेक्षा मी आपले चार पावले मागे घेऊन जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था या नावाने सामाजिक संस्थेचे व लोगोचे असे वेगळे रजिस्ट्रेशन करूण घेतले व मी माझे कार्य पूढे चालू ठेवले.
परंतु प्रशांत देशमुख याने लोगोतील साम्यता व नावातील साम्यता याचा गैर फायदा घेऊन कुठल्याही पार्किंगला संघर्ष ग्रुपचा लोगों आसणारे वाहन दिसले की त्या वाहनाच्या ड्रायव्हरला जय संघर्ष मणुन बोलते करणे,त्याचे कडून ग्रुप अँडमीनचा नंबर मीळवणे व त्याच्या ग्रुपला अँड होऊन माझी बदनामी करणे व त्यांना मोठमोठ्या पदाचे आमीष देऊन स्वतःच्या संघटनेत ओढणे आणि मलाच ग्रुप मधून रिमूव करणे आशा पध्दतीचा अवलंब करूण स्वतःचे संघटन वाढवण्याचे उद्योग चालू केले.
परंतु येथ पर्यंत ठिक होते.पुढे मात्र यांची मजल माझ्या परिवारातील महिला बाबत गलीच्छ टिपण्णी करणे व व्हाइस रेकाँर्डिंगच्या माध्यमाने शिवीगाळ करणे चालू केल्याने मी प्रशांत देशमुख व त्याच्या इतर साथीदारा विरूध्द दि.22/7/2019 तसेच दि.25/9/2020 रोजी तसेच 12/7/2023 रोजी आशा प्रकारे मी पुंडलिकनगर पोलीस स्टेशन मधे तक्रार अर्ज करूण सततचा पाठपुरावा चालू ठेवल्या मुळे दि.13/8/2023 रोजी पुंडलीकनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक श्री घोडके साहेब यांनी माझी तक्रार संघनकावर टाईप करूण घेतली.परंतु सुरूवातीस त्यांनी माझ्या कडून फक्त सहाच लोकांची नावे,पत्ते व मोबाईल क्रमांक घेऊन पुढिल तपास अन्य दुसरे कोणी तपास अधिकारी करतील तेव्हां ते सदरील मुख्य आरोपी प्रशांत देशमुख याचा मोबाईल जप्त करूण ज्या व्हाटसअप ग्रुपवर चैटिंग ध्दारे तुम्हाला त्रास दिला गेला त्या ग्रुपचे अँडमीन सुभाष देशमुख व शिवीगाळ आणि आरोप करणार्यांची नावे सायबर सेल मधून जे निष्पन्न होतील.त्या सर्वांवर संबंधीत तपास अधिकारी कार्यवाही करतील असे मला श्री घोडके साहेब यांचे कडून सांगण्यात आले होते.
परंतु पुढे माझ्या प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक श्रीमती आडे मँडम यांनी श्री दिपक देशमुख यांचेकडे सोपवला.श्री दिपक देशमुख यांना मी माझ्या कडील आसतील तेवढे अँडिओ, व्हिडिओ तसेच स्क्रिनशॉट मेमरी कार्ड मधे देऊन तोंडी विनंती केली होती की जूलै 2017 मधे प्रशांत देशमुख याच्या चिथावणी वरूण ज्यांनी ज्यांनी गाडी वरील लोगो फाडून केवळ अध्यक्षा मुळे संघर्ष संघटना संपली अशी घोषणा बाजी केली होती. त्या सर्वाचे जबाब नोंदवावेत.परंतु श्री दिपक देशमुख यांचे कडून आता पर्यंत तसे काहिच करण्यात आलेले नसून दि.9/9/2023 रोजी सकाळी ठीक 8 वाजून 30 मनिटाला सदरील गुन्ह्यातील आरोपी बार्शी येथील औंदुबंर जाधव त्याच्या एका साथी दारासह मोटरसाइकलवर येऊन माझ्या घराचे फोटो काढले.त्या बद्दल पण मी तात्काळ पुंडलीकनगर पोलीस स्टेशनला जाऊन cc tv चे फुटेज देऊन तक्रार दाखल केली होती व माझ्या घराचे फोटो काढण्या मागील जाधव याचा उद्देश काय आसावा,तसेच त्याच्या सोबत आसणारी व्यक्ती कोण या बाबत देखील मला माहिती देण्यात यावी अशी विनंती केली होती.परंतु मी स्वतः तपास अधिकारी श्री दिपक देशमुख यांची अनेक वेळा प्रत्यक्ष भेट घेऊन विचारणा केली आसता मला कसलीच माहिती देण्यात आली नाहि.
उलट पक्षी मुकुंदवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री अर्जून पवार साहेब माझ्या विरूध्द करण्यात आलेल्या त्या पण खोट्या तक्रारी बाबत कसलेच पुरावे न पहाता कमालीची तत्परता दाखवून माझ्यावर तात्काळ प्रतिबंधात्मक कार्यवाही करतात.परंतु मी 2017 पासून ते 2023 पर्यंतचे शेकडाभर पुरावे देऊन देखील पुंडलीकनगर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी काहिच कार्यवाही करतांना दिसत नाहित असे का?
यावर मेहरबान साहेबांनी पुंडलिकनगर पोलीस स्टेशन तसेच मुकुंदवाडी पोलीस स्टेशन यांचेकडे चौकशी करूण मला त्वरीत न्याय मीळवून द्यावा व माझ्या विरूध्द खोटी तक्रार देणार्या प्रशांत देशमुख याचेवर कायदेशीर कारवाई करावी.अन्यथा दि.16/10/2023 पासून मी विभागीय आयुक्त कार्यालया समोर आमरण उपोषण चालू करणार आहे.याची नोंद घेण्यात यावी हि विनंती.