![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
मोरगड ता चिखलदरा जि. अमरावती या आदिवासी दुर्गम भागातील अनु.जाती,अनु.जमाती व इतर मागासवर्गीय जातीच्या शिक्षणाच्या प्रवाहात नसलेल्या आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थी विद्यार्थिनी करीता लोकहित आदिवासी बहुउद्देशीय संस्था, लखाड ता अंजनगाव सुर्जी जि अमरावती ची स्थापना केली असून सदर संस्था सन १८६०व सन१९५० चे शासनाचे नियमाप्रमाणे नोंदणीकृत आहे.या संस्थेला उपरोक्त आश्रम शाळा ‘विशेष बाब’ म्हणून महाराष्ट्र शासनाने अंतिम मान्यता देण्याच्या दृष्टीने सामाजिक न्याय विभागातर्फे पत्र पाठवून सदर शाळेची तपासणी करण्याकरिता आदेश दिले होते. त्याप्रमाणे संबंधित विभागाने तपासणी केली असून शासनाकडे अहवाल पाठविला आहे.सदर शाळा अनधिकृत नसून शासनाचे
नियमाप्रमाणे सुरू केलेली असून सदर शाळा प्रथम सुरू करून चालवून दाखवावी लागते व नंतरच शासनाचा अंतिम मान्यता आदेश काढण्यात येतो. अशी प्रक्रिया असून सदर शाळेबाबत कोणतीही स्पष्ट माहिती तक्रार करत्याना नसून हे लोक गैरसमज करून घेऊन सदर शाळा अनधिकृत आहे, त्यांना मान्यता देऊ नये म्हणून शासनाकडे प्रयत्न करीत आहेत. तेव्हा सदर संस्थेने पुढाकार घेऊन ही शाळा ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या मागास,अ.जा.,अ.ज.तसेच गरीब पालकांचे विद्यार्थ्यांकरिता हे कार्य सुरू केले आहे. ही फार अभिमानाची बाब आहे. त्यामुळे या शाळेविषयी जो गैरसमज, न समजणाऱ्यांना निर्माण झाला आहे, तो या भागातील जनतेने दुर करुन घ्यावा व संस्थेने स्व खर्चाने शासनाचे अनुदान मिळेपर्यंत जो पुढाकार घेतला आहे त्याचे कौतुक करावे व सहकार्य करावे. तसेच हि शाळा निवासी असल्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांची निवासाची, जेवणाची व शिक्षणाची सुविधा केली जाते. हि शाळा केवळ मोरगड या गावापूरती नसून या भागातील व तालुक्यातील गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहू नये व त्यांना शिक्षणाचे प्रवाहात आणण्यासाठी सुरू केली आहे . मोरगड येथील स्थानिक केवळ शिक्षण देणाऱ्या शाळेत जे विद्यार्थी प्रवेश घेतात त्यांचे करीता ही शाळा नाही.तर इतर गावांसाठी आहे.त्यामुळे या निवासी शाळेत बाहेरील
विद्यार्थी येणार आहेत. त्यामुळे येथे असलेल्या शाळेच्या पटसंख्येवर कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता ही संस्था घेत आहे. व तसे हमीपत्र सुद्धा संस्था मा. शिक्षणाधिकारी जि.प. अमरावती यांना लिहून देण्यास तयार आहे. त्यामुळे या निवासी शाळेबाबत कोणत्याही व्यक्तीने गैरसमज करून घेऊ नये. असे संस्था चालकांनी सांगितले आहे.