![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
उपसंपादक /राठोड रमेश पंडित
अहमदपूर- अहमदपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक युवक मंडळ , अरुण भाऊसाहेब वाघंबर आयोजीत ६७ वा धम्मचक्र परिवर्तन दिन या कार्यक्रमानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर चौक येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पंचशील ध्वजारोहण नगर परिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाचे उद्घघाटक अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकरराव देडे यांनी दीप प्रजलवीत करून उद्घघाटन केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे हे होते त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून माझी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव हे आपल्या पुतळ्यासमोर सभेत आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की,
तथागत गौतम बुद्धाच्या नंतर या पृथ्वीतलावरी तेजस्वी सुर्य म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि आरक्षणाचे जनक म्हणून छत्रपती शाहू महाराजांना ओळखले जाते आणि रयतेचे राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखले जाते त्यांनी जनतेसाठी खूप असे मोठे कार्य केले असून तथागत महामानव भगवान गौतम बुद्ध यांच्या धम्माचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप वर्षे अभ्यास करून त्यांनी येवला येथे मी हिंदू धर्मात मरणार नाही अशी घोषणा करून 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर येथे बौद्ध धम्माचा स्वीकार करून समस्त समाजाला न्याय देण्याचे काम केले अशा महामानवाची कार्य आपण कदापि विसरू शकत नाही. बुद्धाचा धम्म हा संपूर्ण जगात 21 देशात मानला जातो याचा प्रसार मोठ्या प्रमाणात सम्राट अशोकाने आपल्या मुलांना विविध देशात पाठवून प्रसार केला त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या बौद्ध धम्माचा प्रसार केला. बुद्ध धम्म हा भारत देशातलाच असून त्याचा उगम भारतातच झालेला आहे म्हणूनच डॉ. बाबासाहेबांनी विविध धर्माचा अभ्यास करून बुद्ध धम्म चांगला आहे आणि शांतीचा धम्म आहे म्हणून त्यांनी हा धम्म स्वीकारण्याचे ठरविले आणि नागपूर येथे पाच लक्ष लोकांसमोर त्यांनी हा धम्म समाजाच्या लोकांना दिला. म्हणून आपण सर्वांनी बौद्ध धम्माच्या आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञाचें पालन करावे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे शिक्षण घेऊन आपल्या मुलांना शिक्षण देऊन त्यांना मोठे अधिकारी करावे त्यामुळे समाजामध्ये मोठ मोठे अधिकारी निर्माण होतील त्यामुळे आपला समाज सुधरेल आणि त्यांची उन्नती होईल युवकांनी सुद्धा धम्माचे आचरण करावे अशी आपल्या भाषणात माझी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव म्हणाले. त्यानंतर उद्घघाटनपर भाषणात अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकरराव देडे म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेऊन सर्व समाजाला शिक्षित करण्याचे काम केले आणि भारताचे संविधान लिहून त्यांनी सर्व समाजाला न्याय देण्याचे काम केले त्यांनी भारत देशाची घटना रक्तरंजित न करता शांतीने भारताची राज्यघटना लिहून तयार केली काही देशात रक्तरंजित अशा घटना घडल्या पण एकमेव भारत देशात भारताचे संविधान विना रक्त सांडता निर्माण झाली यांचे श्रेय सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिले जाते असे या महामानवांनी नागपूर येथे आपल्या समाजाच्या लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन त्यांना अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे काम केले आहे या बौद्ध धम्माचा
आपण सर्वांनी प्रसार आणि प्रचार करावा त्यामुळे आपल्या देशात बुद्धाचा शांतीचा धर्म निर्माण होईल 21 देशात बुद्ध धम्म मानला जातो आणि आज-काल सोशल मीडियावर काही युवक मोबाईलवर काहीही छेडछाडी करून वातावरण बिघडविण्याचे काम करतात असे केल्यामुळे अशांतता निर्माण होते तरी युवकांना माझी विनंती आहे की आपण सोशल मीडियाचा वापर हा चांगल्या कामासाठी करावा अन्यथा अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही असे आपल्या उद्घघाटक पर भाषणात पोलीस निरीक्षक सुधाकरराव देडे म्हणाले. यानंतर अहमदपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की आम्ही एम.पी.एस.सी. चा अभ्यास करताना मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाचले त्यांनी लिहिलेल्या घटनेचा आम्ही अभ्यास करताना असे वाटायचे की ही घटना लिहिलेली दोन दोन तीन तीन वेळेस वाचावे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली आहे खूप छान आणि सुंदर एकदम सर्व समाजाला त्यात न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे आणि त्याहून चांगले काम म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांचा धम्म समाजाला देऊन त्यांना दिशा देण्याचे काम केले आहे हे काम त्यांनी सर्वात महत्त्वाचे केले असून. माझी सर्व पालकांना विनंती आहे की त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे आपल्या मुलांना शिक्षण देऊन मोठे अधिकारी करावे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते पिल्यानंतर तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणजे आपण जर मोठे शिक्षित झाला तर आपणाला कोणीही काहीही म्हणू शकत नाही त्यामुळे मोठा अधिकारी होण्याचे युवकांनी स्वप्न उराशी बाळगून ध्येय गाठावे असे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे हे ६७ वा धम्मचक्र परिवर्तन दिन या कार्यक्रमानिमित्त आपल्या भाषणात मंगळवारी दि २४ ऑक्टोबर 2023 रोजी म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाबासाहेब पाटील, शिवानंद हेंगणे, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ जोंधळे, अहमदपूर पोलीस स्टेशनचे डी. वाय.एस.पी. मनीषकुमार कल्याणकर, उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, प्रा. डॉ. रूपसेन कांबळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते धर्मपाल मामा गायकवाड, पी.एस.आय. प्रभाकर आंधोरीकर, डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, धनंजय जाधव, अजहर बागवान, चंद्रशेखर भालेराव, अहमद तांबोळी,अफरोज शेख, सुजित गायकवाड, शिवाजी भालेराव, बाबासाहेब वाघमारे, प्रा. राहुल गायकवाड, दुगाने सर, प्रकाश फुलारी फुलारी, अभय मिरकले, पत्रकार शिवाजीराव गायकवाड, भीमराव कांबळे, अजय देशमुख, सुभाष साबळे, जीवन गायकवाड, माधव तिगोटे, प्रा.डि.बी. शिंदे, देविदास कांबळे, वाल्मीक कांबळे, देविदास ससाणे, दयानंद वाघमारे, विठ्ठल गायकवाड, सौ अंजलीताई वाघम्बर, सौ. अंधोरीकर ताई, जयश्री ताई गायकवाड, हे होते यावेळी त्रिशरण पंचशील सौ.अंजली वाघंबर,इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार मंडळाच्या वतीने पंचशील शाल व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक/ निमंत्रक अरुण भाऊसाहेब वाघंबर यांनी आपल्या भाषणात सांगितले की आजच्या काळात युवकांनी बुद्ध धम्माचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचे पालन करून धम्माचे आचरण करावे, आणि सोशल मीडियाच्या मागे न लागता त्याचा गलत कामासाठी वापर न करता चांगल्या कामासाठी वापर करून आपले अभ्यासात लक्ष देऊन चांगला अभ्यास करून मोठे अधिकारी बनावे आणि समाजाला पुढे नेण्याचे काम करावे असे आपल्या प्रास्ताविक पर भाषणात अरुण भाऊसाहेब वाघंबर म्हणाले. तत्पूर्वी डी.वाय.एस.पी. मनीष कुमार कल्याणकर, बाबासाहेब कांबळे,बाबासाहेब वाघमारे, डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी सौ अंजली ताई जनतेचे मत कार्यकारी संपादक राठोड रमेश पंडित ,वाघंबर, सुजित गायकवाड,
स.पो.नी. प्रभाकर आंधोरीकर, गोपीनाथराव जोधळे इत्यादी मान्यवरांनी आपल्या भाषणात महामानवांचे विचार मांडले हा ६७ वा धम्मचक्र परिवर्तन दिन कार्यक्रम सोहळा यशस्वी करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक अरुण भाऊसाहेब वाघंबर, कलीम अहमद , सुमित वाघबर , आदित्य वाघंबर, सचिन गायकवाड,आकाश व्यवहारे ,बाबु भाई शेख, श्रीरंग गायकवाड रितेश वाघंबर, लक्ष्मण बनसोडे,नामपल्ले,आदिनी परिश्रम घेतले, सूत्रसंचालन शाहीर सुभाष साबळे यांनी केले तर आभार जीवन गायकवाड यांनी सर्वांचे मानले. यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि शाहीर संजय गायकवाड अँड श्रीरंग गायकवाड पार्टी उदगीरकर यांचा भीम बुद्ध गीतांचा दणदणीत असा कार्यक्रम दिवसभर झाला.अरुण भाऊसाहेब वाघंबर