
गोंदिया जिला प्रतिनिधि/ अशोक कटकवार
पुराडा येथे ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिवस उत्साहाने साजरा
प्रतिनिधी/गोंदिया : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गावोगावी ग्रामस्थ बौध्द धम्मासाठी घरोघरी जातात किंवा धम्मामुळे समाजक्रांती होऊन बौद्ध धम्माच्या विचारांचा विविध प्रकारे प्रसार होतो. सोबतच धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध बौद्ध धम्म गीते आणि प्रबोधनात्मक नृत्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. बौद्ध धर्म हा जगातील सर्वात मोठा धर्म असून धम्मचक्रातील बदलामुळे मोठी क्रांती झाली आहे, धम्माच्या संकल्पाने जीवन जगण्याची कला शिकायला मिळते. बाबासाहेबानी स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता लोकहितासाठी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. असे प्रतिपादन माजी आ.संजय पुराम यांनी पुराडा येथे ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिवस निमित्ताने केले. यावेळी माजी आ.संजयजी पुराम, श्री. लक्ष्मीशंकरजी मरकाम सरपंच ग्रामपंचायत पुराडा, मा.सौ. ममताताई अंबादे प.स. सदस्य देवरी, मा.श्री. दिलिपजी जूळा सरपंच ग्रामपंचायत ढिवरीनटोला, मा.श्री. उपसरपंच ग्रामपंचायत पुराडा रामेश्वरजी आचले, मा.श्री. राहूलजी साखरे ग्रामपंचायत सदस्य पुराडा, मा.श्री. प्रकाशजी साखरे, मा. श्री. अशोकजी वालदे, मा.श्री. भुमेशजी साखरे, मा.श्री. सुरेशजी साखरे, मा.श्री.संदेशजी साखरे, मा.श्री. मयूर वालदे व सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते.





Total Users : 883255
Total views : 6488731
