![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तिरोडा:- तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रात सिंचन विकासावर आमदार विजय रहांगडाले यांनी भर देत धापेवाडा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून शेतक-यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला आहे त्याच बरोबर ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी आमदार निधीतून अथवा ग्राम विकास मंत्रालयातून भरीव निधी खेचून आणण्यात विशेष भर दिला आहे ग्राम विकास विभाग लेखाशीर्ष २५१५ योजनेमार्फत डोंगरगाव (ख.) २५.०० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले असून या कामांचे भूमिपूजन आमदार महोदयांच्या हस्ते संपन्न झाले मंजूर विकासकामांमध्ये शामराव कटरे ते फुलचंद पारधी यांच्या घरापर्यंत रस्ता व नाली बांधकाम १०.०० लक्ष, मुख्य रस्ता ते मोरेश्वर पटले यांच्या शेतापर्यंत रस्ता बांधकाम ५.०० लक्ष, नैपाल कटरे ते सुकराम येरपूडे यांच्या घरापर्यंत रस्ता बांधकाम १०.०० लक्ष अशा एकूण २५.०० लक्ष रुपये विकासकामांचा समावेश आहे भूमिपूजन कार्यक्रमास प्रामुख्याने सरपंच शिशुपाल पटले, जि. प. सदस्य माधुरी रहांगडाले, प.एस.सदस्य माजी जि. प. सदस्य मा. श्री. मदन पटले, उपसरपंच. शुभम भैसारे, सा.का. कैलाश कटरे, माजी सरपंच देवेंद्र कटरे, सदस्यगण व समस्त डोंगरगांव ग्रामवासी उपस्थित होते.