![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तिरोडा- तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या माध्यमातून तिरोडा शहरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत एक नवीन डिपीआर मंजूर करण्यात आले असून या अंतर्गत नगर परिषद क्षेत्रातील एकूण ३७७ गरजू लाभार्थ्यांना आवास योजनेचा लाभ मिळणार आहे मागील वर्षीपासून शहरातील लाभार्थ्यांची सतत मागणी होत होती त्यावर आमदार महोदयांनी तातडीने शासनाकडे पाठपुरावा केला असता नवीन डीपीआर मंजूर झालेला असल्याची माहिती आमदार महोदयांनी दिली