![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर प्रतिनिधि /नव्या पाणीपुरवठा योजनेचे पाणी ३१ डिसेंबरपर्यंत तुमसरकरांना न मिळाल्यास या योजनेच्या अनुषंगाने चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे तुमसरचे माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी स्पष्ट केले आहे.
दोन वर्षांपूर्वी तुमसर शहरवासींयाना शुद्ध आणि मुबलक
पाणी मिळावे या हेतूने अमृत योजनेंतर्गत नव्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. जवळपास ४७ कोटी खर्चुन ही योजना निर्माण केली जात आहे. परंतु, आज दोन वर्ष लोटून एकही थेंब पाणी तुमसरकरांना मिळू शकले नाही. उलट जुन्या पंप हाऊसमध्ये बिघाड झाल्याने लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील
नागरिकांना चौकशीची मागणी करणार पाणीपुरवठा करणारी योजना अपयशी ठरत आहे. म्हणूनच नवीन योजनेचा घाट घातला गेला. मात्र, बांधकामासाठी असलेली मुदत निघून गेली असतानाही काम पूर्ण झाले नाही. पाणी मिळाले नसतानाही जलपूजन करण्याचा प्रयत्न झाला. या योजनेतून ३१ डिसेंबरपर्यंत तुमसरकरांच्या घरात पाणी पोहोचले नाही तर योजनेची चौकशी करण्याच्या मागणीला घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे अभिषेक कारेमोरे यांनी स्पष्ट केले आहे.