![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
भंडारा : भंडारा विधानसभेच्या धारगाव व डव्वा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आज आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेनेत प्रवेश घेतला. आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयात या कार्यकर्त्यांना भगवा दुपट्टा घालून प्रवेश देण्यात आले.
आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या द्वारे भंडारा पवनी विधानसभेच्या प्रत्येक क्षेत्रात विकास कार्य करीत कोट्यवधी चा निधी आणला गेला असून घोषित केलेले कार्य प्रारंभ सुद्धा झाले आहेत. या कार्यांना बघता त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ही वाढत जात आहे. अश्यात विविध गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिव सेनेत प्रवेश करणे सुरू केले आहे. आज धारगाव व डव्वा या क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आम. नरेंद्र भोंडेकर यांचे नेतृत्व स्वीकारून शिवसेनेत प्रवेश घेतला. यात विशाल चोपकर, दीपक वंजारी, प्रकाश वंजारी, संदीप वंजारी, विकास बोंद्रे, केशव वंजारी, संदीप चोपकर, शैलेश माणापुरे व दिनेश वंजारी संहित अन्य कार्यकर्त्यंचा समावेश असून आम. भोंडेकर यांनी जनसंपर्क कार्यालयात भगवा दुपट्टा घालून त्यांचे पक्षात स्वागत केले. या वेळी तालुका प्रमुख प्रमोद सर्वे व मंगेश निंबार्ते हे उपस्थित होते.