



तुमसर प्रतिनिधि/ भंडारा-बालाघाट महामार्ग 543 के चे माजी आमदार चरण भाऊ वाघमारे यांचे कार्यालय समोरील दिवायडर ला मागील दोन दिवसांपूर्वी रेतीचा ट्रक ने धडक दिली त्या धडकीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रेती पसरली होती, त्या रेतीतून जाताना दोन दिवसांत शेकडो दुचाकी वाहनांचे अपघात झाले, ही बाब भारत राष्ट्र समितीचे पूर्व विदर्भ समन्वयक तथा माजी आमदार चरण भाऊ वाघमारे यांच्या लक्षात येताच त्यांनी उपविभागीय अभियंता पिपरेवार यांना फोन करून माहिती दिली, वेळेवर मजूर उपलब्ध न झाल्याने तुमसर पंचायत समितीचे उपसभापती हिरालाल जी नागपुरे, माजी सरपंच अविनाश उपरिकर, उमेश बघेले, अमोल मंदूरकर, खेमराज मेश्राम,विजय भुरे, आकाश चोपकर आणि स्वतः पिपरेवार उपविभागीय अभियंता यांनी हातात फावडा घेऊन लोकांचे जीव वाचविण्यासाठी श्रमदान केले.
वेळेवर केलेल्या उपाययोजना मुळे निश्चितच अपघातास आळा बसेल. परंतु ज्यावेळी अशे अपघात होतात त्यांचेवर कार्यवाही करतांना पोलीस विभागाने सम्बधित रस्त्याची झालेली दुर्दशा बद्दल योग्य काळजी घायची आवश्यकता आहे.