![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर प्रतिनिधि/ दिनांक 11 नवंबर 2023 रोज शनिवार ला जांभोरा येथे परमात्मा एक भवन सभामंडप चे लोकार्पण सोहळा चे उद्घाटन मा. श्री.आमदार राजू मानिकरावजी कारेमोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
आमदार साहेब यांनी परमात्मा एक भवन करीता आपल्या स्थानिक विकास निधितून १० लक्ष रूपये मंजूर करुन बांधकाम पूर्ण करुन दिले त्यावेळी सेवकानी आमदार साहेब यांचे शाल श्रीफल देऊन स्वागत केले व आभार सुद्धा मानले. त्यावेळी उपस्थित मोहाड़ी पंचायत समिती चे सभापती रितेश वासनिक, तसेच जिल्हा परिषद सदस्य महादेवजी पचघेरे, तसेच सौ. प्रितिताई शेंडे पं. स. सदस्य मोहाड़ी, चंदूभाऊ सेलोकर, तेथील सरपंच सौ. राऊतताई, उपसरपंच यादोवराजी मुंगमुडे, तसेच ग्रामपंचायत सदस्य भूपेंद्र पवनकर,तसेच ग्रामपंचायत सदस्य, सौ.सुंदराबाई मूंगमुडे, याकूब बर्वे, जगनीत,पंडूजी मुंगमुडे तसेच उपस्थित परमात्मा एक सेवक कमिटी चे अध्यक्ष हट्टेवारजी, ग्रामविकास अधिकारी अनिल धमगाये,तसेच सेवक सेविका बालगोपाल व ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.