



मंत्रालयातील धान खरेदी संबंधी झालेल्या बैठकीत खा.प्रफुल पटेल समवेत अन्य जनप्रतिनिधी उपस्थित
खरीप हंगाम २०२३ -२०२४ करिता किमान आधारभूत किंमत खरेदी आयोजनेअंतर्गत राज्य शासनाने धान खरेदी करण्याच्या अनुषंगाने काही अटी व नियम लावण्यात आले होते. या जाचक अटी नियम शिथिल करण्याच्या संदर्भात खा.प्रफुल पटेल यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांच्याशी तात्काळ बैठक लावण्यासंदर्भात चर्चा केली होती. त्या अनुषंगाने आज खरीप हंगाम २०२३ करिता आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांच्या अध्येक्षतेत व खा.प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत धान खरेदी केंद्र तात्काळ सुरु करणे, धान खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी लावलेले नवीन अटी व नियम शिथिल करणे, शेतकऱ्यांना बोनस व अन्य विषयावर देण्यासंबंधी सकारात्मक चर्चा करण्यात आली.
शेतकऱ्यांचा धानाची कापणी व मळणी सुरु असून अद्यापही धान खरेदी सुरु झाले नव्हते. त्यामुळे शेतकऱयांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. यासंदर्भात खा.प्रफुल पटेल यांनी ना. छगन भुजबळ यांच्याशी धान खरेदी च्या अडी अडचणी विषयी चर्चा केली. यावर खा. प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने आज १ नोव्हेंबर ला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांनी धान खरेदी करण्याच्या संदर्भात बोलावलेल्या बैठकीला खा. प्रफुल पटेल, गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील जनप्रतिनिधी, विभागाचे सचिव, आदिवासी विकास विभागाचे सचिव व अधिकारी, पणन अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत धान खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ यांनी राज्य शासनाने लावलेल्या अडी अडचणी, नवीन अटी व नियम शिथिल करणे, धानाच्या आद्रत्यामुळे तुट व घट अर्धा टक्के करण्यात आली होती ती पूर्ववत करणे, धान खरेदीवरील कमिशन ७/१२ वरील बोझा कमी करणे त्याचप्रमाणे संस्थेला मिळणाऱ्या हमालीमध्ये वाढ, प्रलंबित गोदाम भाड्याचा प्रश्न, धान खरेदी केंद्र तात्काळ सुरु करणे यासह अन्य विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.