![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
गोंदिया प्रतिनिधि/ आज ग्राम बाजार चौक भानपुर येथे दीपावलीच्या पावन पर्वावर दुय्यम शायरी च्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते पार पडले. श्री जैन यांनी सर्व जनतेचा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात.
मनोरंजना सोबतच सामाजिक प्रबोधनासाठी ग्रामीण भागात यासारख्या सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मंडई निमित्त नाटक, दंडार, तमाशा, शाहिरी आणि इतर सामाजिक प्रबोधन आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील अनेक रूढी प्रथा व परंपरा यावर प्रबोधन केले जाते. चांगल्या विचारांचा अंगीकार करावा वाईट रूढी व विचारांचा त्याग करण्याचा संदेश या कार्यक्रमांच्या माध्यमातून केला जातो. या लोककलेचा जोपासण्याचे काम ग्रामीण भागात केले जाते असे प्रतिपादन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केले.
या कार्यक्रमांच्या प्रसंगी श्री राजेंद्र जैन यांच्यासोबतअखिलेश सेठ, केतन तुरकर, नीरज उपवंशी, घनश्याम मस्करे, रवी पटले, सुनील चामट, विंध्यकलाताई पटले, सरिताताई कटरे, प्रीतीताई सेलोटी, चेतनाताई पटले, शकुंतलाताई पटले, कांताबाई बिजेवार, रत्नमालाबाई लिल्हारे, धर्मराज कटरे, योगेश पतेह, दूलीचंद चौरीवार, लील्हारे गुरुजी, डॉ कटरे, भक्तराज खरोले, रंजीत टेंभरे, रामेश्वर चौरागडे, मुनेश्वर कावडे, योगेश कनसरे, पदमभाऊ चौरिवार, रौनक ठाकूर, अमदास डहाके, प्रेमलाल चौरीवार, राजूभाऊ डहाके, मिलकेस्वर टेंभरे, विजेंद्र पटले, मदनलाल बागडे, शोभेलाल डहाके सहीत मोठ्या संख्येने ग्रामवासी उपस्थित होते.