![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
नागपुर प्रतिनिधि/ गोवारी शहीद स्मृती दिनानिमित्त नागपूर येथील झिरो माईल परिसरातील गोवारी स्मारकाला अभिवादन केले. १९९४ साली आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करताना शहीद झालेल्या सर्व गोवारी बांधवांप्रति आदरांजली वाहिली.
याप्रसंगी आयोजित नेत्र तपासणी शिबिराला भेट देत नेत्र तपासणीदेखील केली. तसेच समाजबांधवांसाठी आयोजित महाप्रसाद सेवेतही सहभाग नोंदवला.
गोवारी समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळण्याकरिता अनेक वर्षांपासून लढा सुरु आहे. मा. श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वातील तत्कालीन भाजप सरकारने गोवारी समाजाच्या अडचणी शासन स्तरावर सोडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. मीदेखील आदिवासी विकास मंत्री पदाच्या कार्यकाळात बांधवांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. परिणामी आज अनेक जण चांगल्या शिक्षण घेऊन चांगल्या पदावर नोकरी करत आहेत, याचे समाधान आहे.
उच्च न्यायालयातील लढाई यशस्वी झाल्यानंतर २०१८-१९ मध्ये समाजबांधवांना शैक्षणिक अभ्यासक्रमातील सवलत सुरु झाली होती.
मात्र २०२०-२०२१ मध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकाळात जात प्रमाणपत्र असूनही गोवारी समाज बांधवांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात समाजबांधवांची बाजू मांडण्यात अपयश आले. त्यामुळे बांधवांना या सवलती मिळणे बंद झाले आहे. सुप्रीम कोर्टातील हा लढा अजूनही सुरु असून बांधवांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठीच्या लढाईत मी सदैव सोबत राहीन, असे आश्वासन देतो.
आजच्या कार्यक्रमप्रसंगी श्री शालीक नेवारे जी, आदिवासी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष श्री कैलाश राऊत जी, माजी आमदार श्री मिलिंद माने जी, श्री नरेश बरडे जी, श्री जयदेव राऊत जी, सौ माहेश्र्वरीताई नेवारे, श्री अनंत जगणीत जी, श्री हेमराज नेवारे जी, श्री सुरेश कोहळे जी, मुख्य सचिव श्री सुरेन्द्र राऊत जी, श्री दशरथ ठाकरे जी, श्री संतोष वाघाडे जी, श्री संजय वाघाडे जी, श्री राजेंद्र शेंद्रे जी, श्री बंडू भाऊ गजभे जी, श्री बंडू भाऊ नेवारे जी, श्री सुनील राऊत जी, श्री अशोक नेवारे जी, श्री अरुण नेवारे जी, श्री विजय डोंगरे जी, श्री राहुल ठाकरे जी तसेच समाज बांधवांनी उपस्थिती होती.