



तुमसर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातील युवा वॉरिअर्स यांची कार्यशाळा शुक्रवार रोजी भाजप प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. युवकांशी परस्पर संवाद साधून मोदीजींच्या स्वप्नातील नव भारत घडविण्याच्या पूर्ती पूरक ‘महाविजय २०२४’ साठी योग्य नियोजन व रणनीती आखत संघटनात्मक कार्य करण्याविषयी त्यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. त्यात प्रामुख्याने लोकसभा मतदार संघ बांधणी, विधानसभा मतदार संघ बांधणी, नव मतदार नोंदणी मोहीम, वॉर रूमचे नियोजित कार्य, प्रसार माध्यमांशी ताळमेळ, लोकसभेचे प्रवास दौरे, बूथ सशक्तीकरण, केंद्रीय योजनांचे मार्गदर्शन, सरल ॲपद्वारे प्रत्येक कार्यकर्त्यांशी थेट संवाद अश्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा तथा रणनीती आखण्याचे वर्ग घेण्यात आले. यावेळी खासदार सुनिल मेंढे, माजी पालक मंत्री परिणय फुके, लोकसभा संघटक बाळाभाऊ अंजनकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे, तुमसर मोहाडी विधानसभा प्रमुख प्रदीप पडोळे, माजी खासदार शिशुपाल पटले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप ताले, जिल्हा परिषद सदस्य बंडू बनकर, दिलिप सार्वे, धुरपता मेहर, जिल्हा महामंत्री संजय कुंभलकर, गीता कोंडेवार, कल्याणी भुरे, मोहाडी तालुका अध्यक्ष भगवान चांदेवार, तुमसर तालुका अध्यक्ष काशिराम टेंभरे, शहर अध्यक्ष पंकज बालपांडे, मयुरध्वज गौतम, पवन पाटील, संतोष वहिले, प्रीती मलेवार तसेच शेकडो वॉरियर्स उपस्थित होते.