![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
गोंदिया प्रतिनिधि/ सार्वजनिक मंडई मेला उत्सव समिती च्या वतीने माता चौक, शिवनी (गोंदिया) येथे प्रतिवर्षां नुसार दीपावली च्या शुभ पर्वावर मंडईच्या निमित्याने जागरण एवं आर्क्रेस्टा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार श्री राजेंद्र जैन होते. या प्रसंगी श्री राजेंद्र जैन यांनी सर्वांना दीपावली च्या व मंडई निमित्त शुभेच्छा दिल्या.
माजी आमदार श्री राजेंद्र जैन म्हणाले की, खासदार श्री प्रफुल पटेल जी यांचे नेतृत्वात गोंदिया येथील मेडिकल कॉलेजच्या इमारतीचे बांधकाम लवकर सुरू करण्यात यावे, आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करावे, धानाला बोनस, प्रलंबित डांगोरली सिंचनाच्या समस्या मार्गी लावण्यात याव्यात यासह परिसरातील समस्यांवर मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली.
कार्यक्रमप्रसंगी श्री राजेंद्र जैन सोबत सर्वश्री केतन तुरकर, छत्रपाल तुरकर, सुनील पटले, राजू गौतम, कृष्णा गौतम, धुर्वेराज ऊके, सरिता ठाकरे, मिलिंद रामटेके, उर्मिला प्रधान, नामदेव कारे, किरण पटले, अमरलाल चौधरी, संजय कटरे, भुरूलाल रहाँगडाले, कैलाश ठाकरे, प्रीति गोंडाने, प्रेमलाल कटरे, रविंद्र पटले, रौनक ठाकूर, पांडुरंग गौतम, रिखिलाल कटरे, काजल रामटेके, कविता ठाकरे, आरती मानकर, प्रीतमलाल रहाँगडाले, पुरुशोत्तम ठाकरे, भिवलाल गौतम, सुरेश गौतम, चट्टानसिंह बंसोड, महेंद्र चौधरी, महेंद्र बिसेन, तेजलाल ठाकरे, धनलाल ठाकरे मोठया संख्येने ग्रामवासी व रसिक उपस्थित होते.