



साकोली विधानसभा क्षेत्रातील विविध गावातील मंडई निमित्त कार्यक्रमाला उपस्थिती
भंडारा:-मनोरंजना सोबतच सामाजिक प्रबोधनासाठी ग्रामीण भागात आयोजित होणाऱ्या मंडईचे मोठे महत्त्व आहे. मंडईनिमित्त नाटक, दंडार ,तमाशा, शाहिरी, आणि इतर सामाजिक प्रबोधन तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील अनेक रुढी ,प्रथा व परंपरावर प्रबोधन केले जाते चांगल्या विचारांचा अंगीकार करून वाईट रुढी व विचारांचा त्याग करण्याचा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला जातो, या लोककला जोपासण्याचे काम ग्रामीण भागात मंडईच्या निमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमातून केले जाते.. त्यामुळे गावात एकोपा व सामाजिक वातावरणही सुदृढ राहण्यास मदत होते असे प्रतिपादन माजी पालकमंत्री तथा विधान परिषद सदस्य श्री परिणय फुके यांनी पिंडकेपार येथे मंडई निमित्य आयोजित नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी केले. साकोली विधानसभा क्षेत्रात सध्या मंडई निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल सुरू आहे .मंडई निमित्त आयोजित लाखनी त्् तालुक्यातील राजेगाव मोरगाव,रेंगेपार कोठा, पिंडकेपार तसेच इतरही ठिकाणी मंडई निमित्त आयोजित कार्यक्रमांना मा. पालकमंत्री परिणय फुके यांची उपस्थिती होती पिंडकेपार येथे मंडईनिमित्त आयोजित गणेश प्रासादिक नाट्य मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी मा. पालकमंत्री परिणय फुके तसेच विहिपचे जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव बाळबुधदे,शरद भुजाडे, विलास समरित ,भारत वडीचार ,योगेश चांदेवार ,श्री तोडसाम ,दूलीचंद कुशराम ,डाँ.राजकुमार समरीत, अंगराज समरीत ,मुरारजी भुजाडे, पुरुषोत्तम रूखमोडे ,माजी जि प सदस्य नेपाल रंगारी, मा. नगरसेवक रवी परशुरामकर, मा.नगरसेवक मनीष कापगते तालुकाध्यक्ष अमोल हलमारे सुषमा भुजाडे, ममता भुजाडे अनिल टेंभरे, सुरेश बघेल, प्राध्यापिका लंजे यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती तर रेंगेपार कोठा येथील मंडई निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला मा. पालकमंत्री परिणय फुके यांच्या सोबत आनंद मडावी , लाखनी तालुकाध्यक्ष श्रावण कापगते, रवी तितरमारे बंदलाल काडगाये,सारंग काडगाये वसंता कुंभरे, संदीप भांडारकर नूतन टिचकुले ,नागोराव चोपकर अश्विन काडगाये काही तसेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,साकोली विधानसभा क्षेत्रातील विविध गावांमध्ये दिवाळी पर्वा निमित्त मंडई निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला मा. पालकमंत्री परिणय फुके यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाचे उद्घाटन करून मार्गदर्शन केले