![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
पुणे प्रतिनिधि/ :लोकचळवळीतून निर्माण झालेल्या आम आदमी पक्षाची यशस्वी राजकीय वाटचाल देशभरात होत आहे. पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विकासात्मक दृष्टीमुळे पंजाबमध्ये देखील पक्षाला मोठे यश मिळाले. देशभरात आज जातीय आणि सामाजिक ध्रुवीकरणाचे राजकारण सुरु असताना सामान्य जनतेसह युवकांना आम आदमी पक्ष आशेचा किरण दिसत आहे. त्यामुळे पक्षाकडून देखील विस्तार केला जात असून महाराष्ट्रामध्ये नव्याने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
संजय कोने हे फॅसिलिटी क्षेत्रातील एक इमानदार चेहरा म्हणून आज पर्यंत त्यांची ओळख असून त्यांनी पूर्वी केलेले आम् आदमी पक्षाचे काम तसेच नागरीकांच्या असूविधेसाठी केलेला विरोध व उपोषण याचे यश, कामगारांचा थांबलेले पगार कंपन्यांकडून काढूण देणे, ESIC अंतर्गत मोफत आरोग्य सेवा मिळण्यासाठी विविध मोहीम बघता. आम आदमी पक्ष, कामगार आघाडी शहराध्यक्ष पदी संजय कोने यांची सलग दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली.
दिल्ली व पंजाबच्या यश नंतर आम आदमी पक्ष सर्वात जलद वाढणारा व चळवळीतून उभारलेला भ्रष्टाचार तसेच नागरीकांच्या कररूपी पैशांतून त्याच्या दर्जेदार सुविधा देणारा भारतातला एकमेव पक्ष म्हणून त्याची वाटचाल चालू असताना पुणे शहरात पक्षाची वाढती लोयप्रियता बघता विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.
आम आदमी पक्षाच्या पुणे कामगार आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर माननीय संजय कोने म्हणाले, “शाळा तसेच महाविद्यालयीन जीवनापासून अरविंदजी केजरीवाल यांचे विचार, त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे मी प्रभावित झालो. आपल्या लोकांच्या आणि समाजाच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून कोणताच देश विकास करू शकणार नाही. आज देशात आणि राज्यामध्ये अनिश्चिततेच राजकारण सुरु असल्याने कामगारांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. या कामगारांनी आता पुढे येऊन राजकरणात सक्रीय होणे गरजेचे आहे. येत्या काळामध्ये पक्षाने दिलेल्या संधीच्या माध्यमातून पुणे शहरातील कामगारांना‘आप’मध्ये सक्रीय करण्यासाठी काम करणार आहे.”
विविध युनियन, कंपनीतील मॅनेजर तसेच कामगारांनी त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देत अभिनंदन केले.