![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
पुणे शहर पुणे: लोकचळवळीतून निर्माण झालेल्या आम आदमी पक्षाची यशस्वी राजकीय वाटचाल देशभरात होत आहे. पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विकासात्मक दृष्टीमुळे पंजाबमध्ये देखील पक्षाला मोठे यश मिळाले. देशभरात आज जातीय आणि सामाजिक ध्रुवीकरणाचे राजकारण सुरु असताना सामान्य जनतेसह युवकांना आम आदमी पक्ष आशेचा किरण दिसत आहे. त्यामुळे पक्षाकडून देखील विस्तार केला जात असून महाराष्ट्रामध्ये नव्याने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पुणे शहरातील असणारे ॲड गुणाजी मोरे यांची पुणे शहर युवा आघाडीच्या सहसचिव पदी पक्षाकडून नियुक्ती करण्यात आली आहे.
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी डॉ संदीप पाठक, महाराष्ट्र प्रभारी प्रभारी श्री. गोपाल इटालीय व पुणे शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, पुणे युवा शहराध्यक्ष अमित मस्के यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे यांची पुणे शहर युवा आघाडीच्या सहसचिव पदी नेमणूक केल्याची घोषणा केली आहे. ॲड गुणाजी मोरे हे फुरसुंगी प्रभागामध्ये राहत असून, यापूर्वी ते पुणे शहर च्या वेगवेगळ्या आघाडीमध्ये काम करत होते पुणे शहर लीगल सेल सदस्य म्हणून कार्य करत होते. या काळामध्ये त्यांनी पुणे शहरामध्ये युवकांचे संघटन करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. युवा संवाद सारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी युवकांना राजकीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी काम केलं. वेगवेगळी सामाजिक कार्य ही ॲड गुणाजी मोरे यांच्याकडून करण्यात आले.
आम आदमी पक्षाच्या पुणे शहर युवा आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ॲड गुणाजी मोरे म्हणाले, “शाळा तसेच महाविद्यालयीन जीवनापासून अरविंदजी केजरीवाल यांचे विचार, त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे मी प्रभावित झालो. आपल्या लोकांच्या आणि समाजाच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून कोणताच देश विकास करू शकणार नाही. आज देशात आणि राज्यामध्ये अनिश्चिततेच राजकारण सुरु असल्याने युवकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. या युवकांनी आता पुढे येऊन राजकरणात सक्रीय होणे गरजेचे आहे. येत्या काळामध्ये पक्षाने दिलेल्या संधीच्या माध्यमातून पुणे शहरातील युवकांना ‘आप’मध्ये सक्रीय करण्यासाठी काम करणार आहे.”