



भंडार : मागील काही दिवसात जिल्ह्यात अवकाळी पावसाने चांगलाच थैमान मांडला. यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या पिकांचा नुकसान झेलावा लागला. आम. नरेंद्र भोंडेकर यांनी आज अवकाळी पावसाने झालेल्या नुकसणी कहा आढावा घेत नुकसान ग्रस्त शेतकाऱ्यांशी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि झालेल्या नुकसणीचा मोबदला मिळवून देण्या करीता शासन दरबारी दाद मागितली असून लवकरच याची भरपाई मिळणार असल्याचे आश्वासन दिले. सोबतच दौऱ्यात असलेल्या महसूल आणि कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ पिकाच्या नुकसानीचे पंचमणे करून शासन दरबारी पाठविण्याचे निर्देश दिले.
आम. नरेंद्र भोंडेकर यांनी आज भंडारा विधानसभा क्षेत्रातील पांढराबोडी, खुरशीपार, मोहदुरा, हत्तीडोई, गोपीवाडा, खरबी, खराडी, मंडणगाव, मालीपार, मानेगाव, बोरगाव, चोवा, वादड, निमगाव, इटगाव व अन्य नुकसन ग्रस्त ग्रामीण क्षेत्राला भेट दिली. आम. भोंडेकर यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पहाणी करून झालेल्या नुकसांनीचा आढावा घेतला. या वेळी शेतकऱ्यांनी आम. भोंडेकर यांना झालेल्या नुकसनी ची संपूर्ण माहिती दिली आणि मोबदला मिळवून देण्याची विनंती केली. यावर आम. भोंडेकर यांनी शेतकऱ्यांचे सांत्वन केले आणि सांगितले की या संदर्भात दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री शिंदे साहेबांना निवेदन देऊन झालेल्या नुकसणीची कल्पना देण्यात आली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सारसकर कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली आहे. सोबतच पीक विमा असल्याने शेतकऱ्यांना पिकाच्या झालेल्या नुकसानी चा मोबदला देण्याची मागणी सुद्धह करण्यात आली आहे आणि या वर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर देत नुकसानीचा पंचमनाम करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती दिली. या वेळी आम. भोंडेकर यांनी कृषि विभाग, महसूल विभाग च्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेतले आणि त्यांना क्षेत्रातील शेतीत झालेल्या नुकसाणीचे पंचनामे तत्काळ तयार करून शशन दरबारी पाठविण्याचे निर्देश दिले.