![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
भाजप हा विश्वासघात करणारा पक्ष आहे यांनी अनेकांना संपवण्याचा कार्य केला – आ.भास्कर जाधव (विदर्भ संपर्क प्रमुख, शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे)
गोंदिया येथे स्वागत लाँन मध्ये आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्ता मेळावा निमित्त बोलले आ.भास्कर जाधव (विदर्भ संपर्क प्रमुख, शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे)
प्रतिनिधी/गोंदिया महाराष्ट्रातील एकमेव निष्ठावान कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणजे शिवसेना आहे आणि शिवसेना च्या व्यासपीठावर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमे किंवा मुर्ती शिवाय इतर कोणताही देव नसतो. निष्ठावान कार्यकर्त्यांना सध्या संगठित होऊन कार्य करण्याची गरज आज पुन्हा निर्माण झालेली आहे. गोंदियामध्ये भगवा फड़कवणाच्या काम फ़क्त शिवसेना या पक्षानी केली आहे. शिवसेनेचे आमदार म्हणून माजी आमदार रमेश कुथे हे आमचे सहकारी होते ते दोनदा या शिवसेना पक्षातुन निवडून आले. शिवसेना हा पक्षामध्ये गद्दार गेले असतील परंतु खुद्दार ही आहेत हे आज गोंदिया येथील कट्टर शिवसैनिकानी दाखवून दिला आहे. जे पूर्वी शिवसैनिक होते ज्या लोकांनी शिवसेना या पक्षाला मुसीबताच्या काळामध्ये सांभाळण्याचा कार्य केला अश्या कार्यकर्त्यांना आज एकजुट होण्याची ख-रया अर्थ्याने आवश्यकता आहे त्या लोकांशी भेटा त्यांचाशी चर्चा करा आणि त्यांना सोबत घ्या असे गोंदिया येथे स्वागत लाँन मध्ये आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्ता मेळावा निमित्त बोलले आ.भास्कर जाधव (विदर्भ संपर्क प्रमुख, शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे) यांनी बोलले.
ख-या अर्थ्याने भाजप हा विश्वासघात पक्ष आहे म्हणून भाजप आणि शिवसेनाची युती तुटली परंतु सध्या पक्षाला बळकट देण्यासाठी निष्ठावान कार्यकर्त्यांनी कामावर लागावे गोंदिया विधानसभा मध्ये पुन्हा एकदा भगवा फड़कवून सिद्ध करावयाचा आहे शिवसेना पक्षप्रमुख हे गद्दाराचे पक्षप्रमुख नाही तर हे खुद्दारांचे पक्षप्रमुख आहेत.कोरोना सारख्या उद्भवलेल्या परिस्थिती मध्ये राज्याचे प्रमुख असतांना त्यांनी कश्या प्रकारे राज्याची सुव्यवस्थितपणे सेवा केली कश्या प्रकारे चांगले कार्य केले हे सर्वाना जाणीव आहे आज पुन्हा एकदा मा.उद्धव साहेबांचे हाथ मजबूत करण्यासाठी सर्वानी एकत्र होउन शिवसेनेच्या कामावर लागावे असेही या दरम्यान बोलले. रामटेके पासून गोंदियाला येण्यासाठी ३.३० तास चा वेळ लागला काय हे अव्यवस्था आहे दिसून येत आहे मित्रानो अंधभक्त म्हणतात कांग्रेस ने ७० साल में क्या किया परंतु त्यांना मी सांगू इच्छितो कांग्रेस ने जे केले त्यावरच आज देश चालत आहे मागील १० वर्षामध्ये काय हे अवस्था करण्यात आली आहे हे तुम्हाला माहीत आहे ज्या राज्यामध्ये निवडणुक असतात त्या राज्यामध्ये पेट्रोल डीजल, गैस सिलिंडर चे रेट कमी, ३१०० रूपये धानाला भाव मग महाराष्ट्रामध्ये का नाही कारण त्यांच्याहाती सत्ता आहे असे बोलून ही भाजपवर हल्ला आ.भास्कर जाधव (विदर्भ संपर्क प्रमुख, शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे) यांनी बोलला.
दरम्यान शिवसेना नेते भास्करजी जाधव,प्रकाशजी वाघ साहेब पूर्व विदर्भ समन्वयक , पूर्व विदर्भ संघटक,शिल्पाताई बोडखे महिला पूर्व विदर्भ संघटक,बाबा ठाकुर संपर्क प्रमुख गोंदिया, नरेश माळवे विधान सभा संपर्क प्रमुख, युवासेना सरसिटनीस हर्षल काकडे, पंकज एस यादव शिवसेना जिला प्रमुख,तसेच जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.