



मोहाडी प्रतिनिधि/ दोन दिवसांपूर्वी अचानक घराला आग लागून सर्वस्व गमावलेल्या मोहाडी तालुक्यातील धुसाळा येथील गणेश राखडे आणि त्यांच्या कुटुंबीयांची खासदार सुनील मेंढे यांनी दुसरा येथे त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी झालेल्या घटनेविषयी जाणून घेत खासदारांनी सर्वतोपरी मदत करण्याचा शब्द दिला. शासन स्तरावरून नियमात बसेल तेवढी सर्व प्रकारची मदत मिळवून देण्याचे आश्वासन देतानाच, खासदारांनी व्यक्तिगत स्वरूपातही यावेळी गणेश राखडे यांना मदत केली. अन्नधान्य, कपडे कागदपत्र असे सर्व काही आगीत राख झाले. घटना अत्यंत दुर्दैवी असली तरी हिंमत न हारता नव्याने सुरुवात करा, आपण कायम पाठीशी असल्याचा धीर यावेळी खासदारांनी राखडे कुटुंबीयांना दिला.