



भंडारा : आज आयोजित जिल्हा नियोजन समिति च्या बैठकीत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केलेल्या मागणीला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ विजयकुमार गावीत यांनी हिरवी झेंडि देखवित यावर आठ दिवसाच्या आत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. यात आम. नरेंद्र भोंडेकर यांनी ओबीसी समाजाच्या मूल मुलींकरीता 500 खाटांचे आणि आदिवासी समाजांच्या मूल मुलींकरीत 200 खटाचे वसतिगृह, भंडारा पवनी तालुक्यात पर्यटन करीत सर्किट तयार करणे, कोहळी समाज करीत दोन एकड जागा घेऊन मत्स्य प्रशिक्षण केंद्र आणि समाज भवन स्थापित करणे सोबतच अन्य विविध मागण्या ठेवण्यात आल्या होत्या.
भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्या नंतर डॉ विजयकुमार गवित यांनी आज प्रथम जिल्हा नियोजनाची सभा घेतली. या सभेत उपस्थित आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी ओबीसी समाज आणि आदिवासी समाजाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना उपळसबद्ध असलेल्या वस्ती गृहात जागेची कमतरता असल्याने हॉट असलेल्या त्रासा बद्दल ना. गवित यांना माहिती दिली. आणि ओबीसी समाजाच्या मुलांकरीत 250 आणि मुलींकरीत 250 अक्षय 500 खाटांचे आणि आदिवासी समाजाच्या मुलांकरीत 100 आणि मुलींकरीत 100 अक्षय 200 खटाच्या नवीन वासतिगृहाची मागणी ठेवली. यावर ना. गवित यांनी जिल्हा प्रशासनाला आठ दिवसाच्या अंत जागा उपलब्ध करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले, ज्या नंतर 10 ते 12 दिवसातच राज्य शासन कडून याला मंजूरी मालवून देण्याची हमी त्यांनी दिली. याच प्रमाणे भंडारा आणि पवनी या दोन तालुक्यातिल पर्यटन स्थळाचे होत असलेले विकासा बद्दल माहिती देवून आम. नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा आणि पवनी या दोन्ही तालुक्यात पर्यटन करीत सर्किट उभारण्याची मागणी ठेवली. तसेच आम. भोंडेकर यांनी जिल्ह्यातील कोहळी समाजाचे प्रश्न समोर ठेऊन जिल्ह्याच्या ठिकाणी कमीत कमी दोन एकड जागा उपलब्ध करून देणे आणि यावर समाज भवन सहित मत्स्य प्रशिक्षण केंद्र उभारण्याची मागणी केली. या दोन्ही मागण्यांना सुद्धा पालकमंत्री विजयकुमार गवित यांनी मंजूर केले आणि शासनाला लवकरात लवकर प्रस्ताव सादर होताच याला मंजूरी मिळवून देण्याची हमी त्यांनी दिली. या शिवाय जिल्ह्यातील घरकुल करिता निशुल्क रेती उपलब्ध करून त्यांच्या ट्रॅक्टर वर कारवाई न करण्यात यावी या महनीला सुद्धा त्यांनी सकारात्मक रित्या मान्य केले.