![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
प्रति हेक्टर २० हजाराचे बोनस केले जाहीर
तुमसर : अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल, कृत्रिम समस्यांनी स्थानिक शेतकरी हतबल झाला होता. अनेक स्तरावरून उठणाऱ्या समस्यांचा पाठपुरावा करून तुमसर मोहाडी विधानसभेतील भात उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची बाजू सरकारपुढे मांडली होती. योग्य वेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची ग्वाही राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली होती. त्याचे फलित म्हणून राज्य सरकारने प्रति हेक्टर २० हजार रुपयांचा सरसकट बोनस नुकतेच जाहीर केले आहे. महायुतीचे सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा हा पुरावा असल्याचे मत विधानसभा प्रमुख प्रदीप पडोळे यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान भारतीय जनता पार्टी कार्यालयात सरकारचे आभार देखील व्यक्त केले गेले.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा
– राज्यातील भंडारा जिल्ह्यात मोडणारे तुमसर तथा मोहाडी शेतीप्रधान तालुके म्हणून ओळखले जातात. त्यात भात शेती ही या ठिकाणचे प्रमुख पीक गणले जाते. मात्र चालू हंगामात ओढवलेल्या अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले होते. त्यावर राज्य सरकारने जाहीर केलेल्या बोनस मुले शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी देवाभाऊ दमदार असे नारे देत बोनसचे आनंद व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या आनंदात त्यावेळी पडोळे यांच्या सह भाजपचे काशिराम टेंभरे, भगवान चांदेवार, गीता कोंडेवार, कुंदा वैद्य, प्रीती मलेवार, ललित तुरकर, पंकज बालपांडे, पवन पाटील, आशू पडोळे, तुफान कटरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.