![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तिरोडा प्रतिनिधि/अपंग लोक म्हणजे असे लोक असतात ज्यांना मानसिक किंवा शारीरिक मर्यादा असतात म्हणून ते त्यांच्या दैनंदिन जीवनातील गरजा आणि नोकऱ्या करण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी कोणावर तरी अवलंबून असतात. बहुतेक अपंगांना ऑर्थोपेडिक अपंगत्व म्हणून परिभाषित केले जाते, म्हणजे, शरीर आणि त्याची कार्ये यांचा समावेश असलेले अपंगत्व. मात्र, त्याला ‘कॉग्निटिव्ह डिसॅबिलिटी’ असेही म्हणतात अशा दिव्यांग बंधूच्या समस्या सोडविण्याकरिता मी सदैव तत्पर आहे असे प्रतीपादन तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी केले भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेई यांच्या जयंतीनिमित्त तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील १८ वर्षावरील दिव्यांग बंधूकरिता बॅटरीचलित ट्रायसिकल वितरण करण्याकरिता मूल्यमापन शिबिराचे आयोजन तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रामुख्याने जी.प.सदस्य तथा संगनियो अध्यक्ष चत्रभूज बिसेन, जी.प.सदस्या रजनी कुंभरे, ऍड.सौ.माधुरी रहांगडाले, तुमेश्वरी बघेले, किशोर महारवाडे, शैलेश नंदेश्वर, प.स.सभापती कुन्ता पटले, उपसभापती हुपराज जमाईवार, कृउबास सभापती जितेंद्र रहांगडाले,भाजप जिल्हा उपाध्यक्ष मदन पटले, विधानसभा प्रमुख वसंत भगत, भाजयुमो जिल्हाध्यक्ष ओम कटरे, मजूर सहकारी संस्था सचिव उमाकांत हारोडे, भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, दलित आघाडी जिल्हाउपाध्यक्ष दिगम्बर ढोके, प.स.सदस्य सुनंदा पटले, चेतलाल भगत, कृउबास संचालक रविंद्र वहिले, भाजप कोषाध्यक्ष रामप्रकाश पटले, मा.प्रशासक संजय बैस, सरपंच स्वाती चौधरी, दीपक कुकडे,भाजयुमो शहर अध्यक्ष शीलत तिवडे, शहर उपाध्यक्ष मकरम लिल्हारे, सोशल मिडिया प्रमुख नितीन पराते, वासू कनोजे, सारंग मानकर, ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष डीलेश पारधी,अमोल तीतीरमारे, वसीम शेख दिव्यांग संघटना जिल्हा सचिव दिनेश पटले, दिव्यांग संघटना तालुकाध्यक्ष राजेश बरीयेकर, कार्यक्रम समन्वयक विजय ठोकने, डॉ.धनंजय कांबळे, डॉ.अमोल उमक, प्रमोद खोब्रागडे, सविता डोंगरे, भोलाप्रसाद कडव व विधानसभा क्षेत्रातील दिव्यांग बंधू उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन भाजयुमो जिल्हासचिव विक्की जगणे यांनी केले.