![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार
रामटेक:- रामटेकच्या राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे स्नेहसंमेलनाचे उद्घाटन माजी मंत्री सुनीलबाबू केदार यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उदघाटन करण्यात आले कार्यक्रमाला विशेष अतिथी आमदार श्री. सुधाकरजी आडबाले, रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते श्री. चंद्रपालजी चौकसे (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्राम प्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य तथा पर्यटक मित्र रामटेक), सौ. मुक्ताताई कोकड्डे (अध्यक्षा जी.प. नागपुर), संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार श्री आनंदरावजी देशमुख, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, सौ. रश्मिताई बर्वे (माजी अध्यक्षा जी.प. नागपुर/ सदस्य जी.प. नागपुर), कु. कुंदाताई राऊत (उपाध्यक्षा जी.प. नागपुर), श्री. राजकुमारजी कुसुंबे (शिक्षण सभापती जी.प. नागपुर), संस्थेचे सचिव श्री मयंक देशमुख उपस्थित होते.
स्नेहसंमेलन 30 जानेवारी ते 01 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. स्नेहसंमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक, एकांकिका, रांगोळी, वेशभूषा, नृत्य स्पर्धा, तसेच प्राथमिक विभागातर्फे आदिवासी नृत्य, काश्मिरी नृत्य, नाटक, एकांकिका, पाककला, चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी, त्यांच्या कलेचे कौतुक पालकांनी व रामटेक व रामटेक परिसरातील लोकांनी करावे, म्हणून दरवर्षणीय स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते, असे संस्थेचे सचिव श्री मयंक देशमुख यांनी सांगितले. विद्यार्थी हेच शाळेचे दैवत असून, पुढे ते देशाचे शिल्पकार आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी व त्यांच्या कलागुणांना उभारी देण्यासाठी जे काही प्रयत्न करता येईल,ते संपूर्ण करण्याचे त्यांनी भावना व्यक्त केली संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार श्री आनंदराव देशमुख यांनी 1956 ला राष्ट्रीय आदर्श विद्यालय शिक्षण मंडळ रामटेक ची स्थापना करून, रामटेक तथा 1958 ला राष्ट्रीय आदर्श विद्यालय मनसर शाळेची स्थापना केली मॅंगनीज परिसरात अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, म्हणून गरिब विद्यार्थ्यांसाठी मनसर येथे शाळा सुरू केली 1962 ला नवेगाव खैरी येथे राष्ट्रीय आदर्श विद्यालय स्थापन केले. त्या ठिकाणी आदिवासी समाज अति दुर्गम भागात राहत असून, कोलीत मारा व इतर गाव खेड्यातून आदिवासी व गरीब विद्यार्थी शिकायला येतात.
रामटेक येथे कला व विज्ञान कला शाखा स्थापन करून त्या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालय सुरू करून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दालन सुरू केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार आनंदराव देशमुख, सचिव मयंक देशमुख, उपाध्यक्ष अंशुल देशमुख, संचालक नारायणराव देशमुख, शामराव सेलोकर, निळकंठ महाजन, बर्वे साहेब, होमराज हजारे, दुर्गाताई रागीट इत्यादी संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते.