रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार
रामटेक:- दिनांक 24/01/2024 रोज बुधवारला रामटेक तालुक्यातील चिचाळा येथे श्रीमद भागवत कथा समाप्ती निमित्त दहिकाल्याचा कार्यक्रमात रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते श्री. चंद्रपाल चौकसे (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्रामप्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य / पर्यटक मित्र रामटेक) यांनी भेट दिली व गुरु ज्योती देवीजी (श्रीधाम मथुरा वृंदावन) यांचे श्री. चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम तर्फे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. दयारामजी राय (राष्ट्रीय अध्यक्ष, सरपंच संघटन), माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, श्री. दुधरामजी सव्वालाखे (सदस्य जी.प. नागपुर), श्री. सतीश डोंगरे (सदस्य जी.प. नागपुर), श्री. नरेंद्रजी बंधाटे (सभापती पंचायत समिती रामटेक), डॉ. रामसिंग सहारे, श्री. राजेशजी साहू, श्री. मितारामजी सव्वालाखे, सौ. कविताताई बसीने (सरपंच चीचाळा), श्री. सुनील गयगये (उपसरपंच चीचाळा), श्री. ईश्वर बसीने, बब्रुवान गयगये, पराग बंधाटे, भास्कर गयगये, अनिल शेंडे, अजय सव्वालाखे, गणेश मोहारे, रामेश्वर दमाहे, गिरधारी गयगये, झामसिंग गयगये व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.