![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर : २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा तथा २३ तारखेला वाढदिवसाचे युगल अवचित्य साधून प्रदीप पडोळे तुमसर मोहाडी विधानसभेत मोफत शैक्षणिक ॲप लाँच करणार आहेत. दोन्ही तालुक्यात ५ ते १० वी वर्गाचे शिक्षण घेणाऱ्या राज्य बोर्डाच्या तब्बल ३० हजार विद्यार्थ्यांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे. त्याकरिता २३ जानेवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून त्या दरम्यान विद्यार्थ्यांना सरल शिक्षा ॲपचे मोफत कूपन तथा किट वाटप करण्यात येणार आहे. त्याबाबतची अधिकृत माहिती प्रदीप पडोळे यांनी आयोजित पत्र परिषदेतून दिली आहे. पुणे तथा मुंबई येथील तज्ञ शिक्षक त्या ॲप मधून विद्यार्थ्यांचे वर्ग घेणार, वेळेचे बंधन नसलेल्या त्या सॉफ्टवेअर मधून हजारो विद्यार्थी आपली शैक्षणिक प्रगती साधतील अशी अपेक्षा त्यावेळी पडोळे यांनी व्यक्त केली. शालेय जीवनात कठीण भासणाऱ्या ठळक विषयांना त्यातून केंद्र करण्यात आले आहे. त्याकरिता शहरातील तसेच तालुका स्तरावरील प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना त्यावेळी उपस्थित राहण्याची विनंती देखील पडोळे यांनी केली आहे.
विज्ञान-गणितासह इंग्रजी होणार सोपी
– विद्येचे माहेर घर असलेल्या पुणे येथील सरल शिक्षा लर्निग टीमने पडोळे यांच्या शिक्षण प्रेमी संकल्पनेला वास्तविकतेत साकारले आहे. अंजनाबाई चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत पडोळे यांनी अविरत १२ वर्षे शहरातील विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी वर्ग उपलब्ध करून दिले आहे. आधुनिक तंत्रयुगाचे बोट धरून तीच योजना आता सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुरविले जाणार आहे. त्यातून विज्ञान, गणितासह इंग्रजी विषयाचे धडे गिरविले जाणार आहेत.
ॲप आय प्रोटेक्शन सुरक्षेने सज्ज
– अधिक वेळपर्यंत मोबाईल अथवा तत्सम उपकरणे हाताळल्याने अनेकांना डोळ्याचे आजार सहन करावे लागतात. मात्र पडोळे यांनी साकारलेले ते शैक्षणिक ॲप आय प्रोटेक्शन सुरक्षेने सज्ज असून त्यामुळे विद्यार्थ्यांना डोळ्याची जळजळ, थकवा, दृष्टी जाण्याचे आजार उद्भवणार नाही.
जिल्ह्यातील एकमात्र उपक्रम
– ऑनलाईन शिक्षण पुरविणाऱ्या अनेक संस्था सध्या हयात आहेत. परंतु त्याकरिता पालकांना अवाढव्य रोकड मोजावी लागते. मात्र पडोळे यांनी तीच सुविधा मोफत पुरवून दिल्याने शैक्षणिक क्षेत्रात साधले जाणारे ते एकमेव उपक्रम ठरणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले जाणार असून एक विद्यार्थी एक कूपन अश्या पद्धतीने किटचे मोफत वाटप केले जाणार आहे.