![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
रामटेक प्रतिनिधि/ सुरेंद्र बिंरेनवार
22 जानेवारी 2024 रोज सोमवारला अयोध्या येथे होत असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचा मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा समारोह सोहळ्यानिमित्त रामधाम तीर्थ येथे भव्य महाआरती करण्यात आली रामधाम मध्ये भक्ताची सकाळी पासूनच गर्दी झाली होती व भक्ताच्या मना मनात आणि वानीवर फक्त श्रीरामचाच जय घोष होत होता रामधाम तीर्थ मनसर येथे 15 फूट श्रीरामाची पूर्णकुर्ती मूर्ती ची 12.30 वाजता महाआरती करण्यात आली रामधाम तीर्थ येथे मुख्य भागावर एल ई डी स्क्रिन लावून अयोध्याच्या सोहळयचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले, व श्रीरामच्या झेंडे पूर्ण परिसर मध्ये लावण्यात आले रामधाम पूर्ण राममय झाले होते.
दिवसभर भक्तीमय भजन सुरु होते. मंदिराचा परिसर व मंदिराच्या गर्भ गृहात विदयुत दिवे लावण्यात आले होते व महाप्रसाद चा वाटप करण्यात आला या आनंदाच्या पर्वावर मा. श्री. चंद्रपाल चौकसे (पर्यटक मित्र / संस्थापक रामधाम तीर्थ (मनसर), सौ. संध्या चंद्रपाल चौकसे (संस्थापिका रामधाम तीर्थ (मनसर) यांचा हस्ते हवन करण्यात आले या आनंदाच्या उपस्थितीत मकरंसंक्रात निमित्त हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले गेले या कार्यक्रमात 5000 हजार महिलांची उपस्थिती होती. सौं संध्या ताई चौकसे यांचा हस्ते महिलाना तिळगुळ देऊन वान देण्यात आले. व महिलांनी उखाणे घेऊन फुगडी, नुर्त्य करून आनंद साजरा केला.
यावेळी श्री दयाराम रॉय राष्ट्रीय अध्यक्ष ग्रा. प्र स संघटना, सौं रश्मीताई बर्वे माजी अध्यक्ष जी प नागपूर, सदस्य जी प नागपूर, करूनाताई भोवते उपसभापती पारशिवनी, सौं कलाताई ठाकरे माजी सभापती सदस्य प स रामटेक, सौं शारदाताई बर्वे, सौं विदयाताई चिखले माजी सरपंच, सौं शोभाताई राऊत, सौं माकडे मॅडम, पी टी रघुवंशी, नितीन भैसारे, बबलू दुधबर्वे, अजय खेडगरकर, अमोल खडतकर, राजेश नागपुरे, शिवराम महाजन, कैलास चिंटोले, बाळा बडवाईक, सौं रंजनाताई मस्के, नथुजी घरजाळे, सौं.साक्षीताई चौकसे,सौं योगेश्वरीताई चोखाद्रे माजी सरपंच,सौं लताताई पद्माकर, सौं. अर्चनाताई अमृतकर, सौं कोमलताई घवघवे,सौं स्वेताताई दूधबर्वे,सौं राधाबाई यादव, सौं.ज्योती ताई राऊत सौं अर्चना पेटकर,सौं तुळसाबाई महाजन, सौं मंदाताई कुलरकर, सौं शोभाताई अडामे, सौं यशोदा रहांगडाले, सौं ललिता धंधोलकर, सौं जयश्री मलघाटे, सौं.गौतमा राऊत,सौं पुष्पा बर्वे,सौं यशोधरा लांजेवार, सौं सोनल मुदलीयार उपस्तित होत्या.