![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार
रामटेक :- धान उत्पादक म्हणून रामटेक तालुक्याची ओळख आहे . येथील शेतकऱ्यांकडे खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर धानाची लागवड केली जाते यावर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीचा मुख्य बाजार आवारात धानाची विक्रमी आवक झाली इतकेच नव्हे तर धानाला चांगला भाव मिळाल्याने धान उत्पादक शेतकरी सुखावला आहे यावर्षीचा खरीप हंगामात सुमारे दीड लाख क्विंटल धानाची विक्रमी आवक झाल्याची माहिती बाजार समितीचा अधिकृत सूत्रांनी दिली. धानाला यावर्षी 4400 ते 4800 रुपये प्रती खंडी भाव मिळाल्याने शेतकरी बांधवांनी आनंद व्यक्त केला. गेल्या एप्रिल 2023 मध्ये येथे दीर्घ प्रशासकीय कालावधीनंतर निवडणुकीचा माध्यमातून निर्वाचित संचालक मंडळ येथे पदरुढ झाले सभापती सचिन किरपान व उपसभापती लक्ष्मी कुमरे यांचा नेतृत्वात बाजार समितीचे सर्व संचालक समितीचा उत्पन्नवाढ व विकासाकरिता शर्थीचे प्रयत्न करीत आहेत समितीचे प्रवेशद्वार, व्यापारीक गोदाम, गोदाम, काँक्रिटीकरण, सुलभ शौचालय, अंतर्गत रस्ते, यासह काट्यवधी रुपयाची विविध विकास कामे प्रस्तावित आहेत धान उत्पादक शेतकरी, बाजार समितीत कार्यरत अडते, व्यापारी व कर्मचारी यांचे मोठे सहकार्य मिळत असल्याचे सभापती सचिन किरपान यांनी सांगितले. बाजार समितीमध्ये कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना त्यांचा शेतमालाला योग्य भाव व वेळेत चुकारे मिळतील त्यामुळे शेतकऱ्यांनी रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा आवारातच त्यांचेकडील शेतमाल आणावा असे आव्हाहन सभापती सचिन किरपान यांनी केले आहे.