रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार
रामटेक:- रामटेक शहरातील श्री. अठराभुजा गणपती देवस्थान पंचकमेटी, पापधूपेश्वर वार्ड, रामटेक येथे संकष्ट चतुर्थी महोत्सव निमित्त दहिकाल्याचा कार्यक्रमात रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते श्री. चंद्रपालजी चौकसे (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्राम प्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य तथा पर्यटक मित्र रामटेक) यांनी भेट दिली व श्री. चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम तर्फे कीर्तनकार ह.भ.प. कलादेवी महाराज पडोळे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी आमदार श्री. मल्लिकार्जुन रेड्डी, श्री. हुकूमचंद बडवाईक (अध्यक्ष, श्री. अठराभुजा गणपती देवस्थान पंचकमेटी, पापधूपेश्वर वार्ड, रामटेक), श्री. आलोक मानकर, श्री. नत्थुजी घरजाळे, श्री. नत्थुजी रामेलवार, श्री. श्रीधर पुंड, श्री. मनोहर गायकवाड व समस्त नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.