![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार
रामटेक : गांधी वॉर्ड रामटेक येथे १७ फेब्रुवारीपासून श्रीमद भागवत कथा ज्ञान ला सुरुवात झाली आहे. २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता कथेची सांगता होणार आहे. वृंदावनचे कथाकार संजय कृष्ण महाराज आपल्या मधुर आवाजात कथा करीत आहेत. पहिल्या दिवशी १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कलश यात्रेला सुरुवात झाली. कथेत नारद संवाद, भीष्म स्तुती, शुकागमन, कपिलोपदेश, ध्रुव चरित्र, प्रल्हाद चरीत्र, समुद्र मंथन, वामन अवतार, श्री राम चरित्र, कृष्ण जन्मोत्सव, कृष्ण लीला, गोवर्धन पूजन आदी विषयांवर व्याख्यान करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुष्पा दुबे, सुरेश दुबे, रमेश दुबे, वसंत दुबे,विक्की दुबे, अनुराग दुबे, रुषी किंमतकर, रमेश चौकसे, राजाराम देशमुख, धनराज काठोके, ताराचंद गराडे, बबलू दुबे, उमेश दुबे, आदी प्रयत्नशील आहेत. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.