![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर प्रतिनिधि/ छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान तुमसर शिवजन्मोत्सव सोहळा 2024 निमित्ताने दिनांक 17/02 /2024 रोज शनिवार ला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात मुख्यत्वे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित विविध गीत व नृत्यप्रकार जसे भारूड, जागर, लावणी, पोवाडा इत्यादींचा समावेश करण्यात आला होता ज्यात प्रामुख्याने विविध वयोगटातील मुले,मुली, शहरातील विविध शाळा, विद्यालय, बचत गट व विविध संघटनांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठान चे अध्यक्ष इंजि. नितीन धांडे यांच्या प्रास्ताविकातून झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठान चे सचिव प्रा. अमोल उमरकर व आभार प्रदर्शन अंकुश गभने यांनी केले. प्रतिष्ठानच्या सर्व मावळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम सुरळीत पार पडला.