![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
प्रतिनिधी / गोंदिया सप्टेंबर २०२३ मध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे वैनगंगा नदीलगत असलेल्या शेतकऱ्यांचे उभे पीक पाण्याखाली आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता त्यावर आमदार विनोद अग्रवाल यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शासन दरबारी उचलून धरली होती. यावर शासनाने तत्काळ कार्यवाही करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सूत्र हलवले. या संकटातून शेतकरी बाहेर निघायला होता तोच परत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात परत अवकाळी पावसाने थैमान घातलं आणि शेतकऱ्यांचे होते नव्हते ते पण धानाचे पीक सुद्धा नासले. परत आमदार विनोद अग्रवाल यांनी झालेल्या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून झालेल्या नुकसानी बाबत माहिती दिली. त्यावर शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नुकसान भरपाई देण्यासाठी यंत्रणेला कामावर लावले. परंतु नियमानुसार केवळ शेतात उभ्या पिकांचे नुकसान भरपाई देण्याची तरतूद होती.
अवकाळी पावसाने उभ्या पिकासोबतच कापलेले धानाच्या कडपा आणि जमा केलेल्या धानाचे पूंजने सुद्धा समावेश होते. उभ्या पिकाचे नुकसान तर झालेच परंतु कापणी झाल्यावर शेतात पडलेले कडपा आणि जमा केलेल्या पुंजण्याना अंकुर आले असल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. त्यावर आमदार विनोद अग्रवाल यांनी शासनाला याबाबत जाणीव करून दिली आणि धानाचे पुंजणें आणि कडपा सुद्धा नुकसान भरपाई देण्यासाठी भाग पाडले.
आमदार विनोद अग्रवाल यांनी केलेल्या प्रयत्नांच्या फलस्वरुप गोंदिया जिल्ह्यातील एकूण ६० हजाराच्या वर शेतकऱ्यांना या अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून अंदाजे ६७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यापैकी एकट्या गोंदिया तालुक्यातील २३ हजार शेतकऱ्यांना जवळपास ३२ कोटीचा निधी मंजूर झाला. २७ हजार रुपये प्रति हेक्टरी दराने नुकसान भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
लवकरच ही सर्व निधी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जिल्हा प्रशासन, तहसील प्रशासन, महसूल विभाग, कृषी विभाग, ग्राम सेवक आणि ग्राम पंचायत पदाधिकारी तसेच अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले असल्याने आमदार विनोद अग्रवाल यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांचे नुकसानीची रक्कम वळती करण्याची सूचना केली आहे.