![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
भंडारा प्रतिनिधि/ व्हाईस ऑफ मीडिया भंडाराचा पुढाकार : ज्येष्ठ संपादकांचे लाभणार मार्गदर्शन बाळसाहेब कुळकर्णी, देवेंद्र गावंडे, शैलेश पांडे, आनंद आंबेकर यांची उपस्थिती
भंडारा जिल्ह्यातील वेब न्यूज़ पोर्टल, विविध दैनिके, साप्ताहिक वृत्तपत्र आणि ईलेक्ट्रानिक माध्यमांतील पत्रकारांना मंच मिळावा या उदात्त हेतूने ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या अग्रणी राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या भंडारा शाखेच्या पुढाकाराने भंडाऱ्यात पहिल्यांदाच पत्रकारांचे जिल्हास्तरीय अधिवेशन मंगळवार, 20 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता सामाजिक न्याय भवन येथे आयोजित करण्यात आले आहे.
या अधिवेशनाचे उद्घाटन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक बाळसाहेब कुळकर्णी राहतील. प्रमुख अतिथी म्हणून खासदार सुनिल मेंठे, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे, भंडारा जिल्हा बँकेचे आध्यक्ष सुनिल कुंढे, प्रमुख वक्ते म्हणून लोकसत्ताचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे, डिजीटल तरुणभारतचे संपादक शैलेश पांडे, देशोमतीचे कार्यकारी संपादक आनंद आंबेकर, व्हॉईस ऑफ मीडियाचेविभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधिक्षक लोहीत मतानी, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा बाप-दांदळे तर स्वागताध्यक्ष हिदयी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जैकी रावलानी उपस्थित राहणार आहेत.
पुरस्काराचे वितरण
समाजात सकारात्मक पत्रकारीता रुजावी आणि पत्रकारांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने व्हाईस ऑफ मीडिया’ भंडारा शाखेच्यावतीने पुरस्कार स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील अधिवेशन विजेत्या पत्रकारांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी कृषी वार्ता, ग्रामविकास वार्ता, शोध वार्ता, मानवी अभिरुची वार्ता, दूरचित्रवाहिनी वार्ता असे पाच पुरस्कारांचे वितरण होणार आहे. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व 11 हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय स्पर्धेसाठी आवेदन केलेल्या पत्रकारांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असून अधिवेशनात सहभागी सर्वपत्रकारांचा सन्मान करण्यात करण्यात येणार आहे.