![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार
रामटेक :- तालुक्यातील मौजा हिवरा (हिवरी) व कवलापूर येथे श्री. राजेंद्रजी मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटी) यांच्या नेतृत्वात विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश व जनसंवाद सभा पार पडली. यावेळी हिवरा(हिवरी) येथील श्री गोलू चटप, श्री.अरुण वरखडे, श्री. सूर्यभान परतेती, श्री.शैलेश भलावी, श्री.देवराव बोंडे, श्री.दिलीप नारनवरे, श्री.प्रमोद नेवारे, श्री.मनोहर कुंभलकर, श्री.हेमराजजी गिरडे, श्री.राजकुमार बापट, श्री किशन वरखडे, श्री.महादेव मल्लेवार, श्री.प्रदीप चकोले, श्री.संतोष गडे, श्री.केशव कोठेकर, श्री.राजकुमार बोपचे व कवलापूर येथील श्री.बालक मानवटकर, श्री.राकेश मानवटकर, श्री.रुपेश मुल , श्री.दिलीप गावरे, श्री.विजय मानवटकर, श्री. सुधोधर मानवटकर, श्री.आकाश गौरे, श्री.कोमल गौरे, श्री.प्रतीक मानवटकर यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. यावेळी प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधीकारी तसेच कार्यकर्त्यांचे श्री.राजेंद्रजी मुळक यांनी स्वागत केले तसेच सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना प्रत्येक अडचणीत संपूर्ण शक्तीने मदत करण्याचे वचन देत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व हिवरा (हिवरी) येथे भव्य जनसंवाद सभेला उपस्थित सर्व मायबाप जनतेशी संवाद साधला.
यावेळी श्री. दामोधर धोपटे (अध्यक्ष,रामटेक शहर काँ.क),
श्री.जिवलगजी चव्हाण (संचालक कृ.उ.बा.स.पारशीवनी ), श्री.सुनील गजभिये (सरपंच हिवरा), श्री.राकेश कुंभलकर (उपसरपंच हिवरा),श्री. दिलीप काटोके (माजी सरपंच हिवरा),. श्री लोकेश डहाके,श्री. माधव मलेवार,श्री. प्रमोद नौकरकर, श्री. रवि गुडधे (उपसरपंच साटक ग्रा. प.), श्री.धनराजजी हिंगे, श्री. अरुण चकोले, श्री. दिलीप नारनवरे, श्री. मनोज कुंभलकर, श्री. तुषार काटोके, श्री. अरुण वरखेडे, श्री गोलू चटप, सौ. आशाताई जांभुळे, सौ. निर्मलाताई श्रीरामे, सौ.सीताताई श्रीरामे इत्यादी कार्यकर्ता व गावकरी मंडळी उपस्थित होते.