![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार
साजरे करू मकर संक्रात, करू संकटावर मात, हास्याचे हलवे फुटून, तिळगुळाची करू खैरात…. तिळगुळ घ्या आणी गोळगोळ बोला…!
ग्राम पंचायत कार्यालय नगरधन तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नगरधन येथील पटांगणवरती महिला मेळावा निमित्त हळदी कुंकूचे कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सौ. वर्षाताई धोपटे, मा. सभापती व मा. सदस्य जि. पं नागपुर, कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री. ॲड.आशिषजी जयस्वाल आमदार रामटेक विधानसभा क्षेत्र, मा.श्री. कृपालजी तूमाने खासदार, रामटेक लोकसभा क्षेत्र यांच्या अर्धांगिनी सौ . रेवतीताई तुमाने, माजी सरपंच सौ. शालिनीताई बागडे, सौ.पौर्णिमा कामडी मुख्याध्यापक, सरस्वती कॉन्व्हेन्ट नगरधन व् इतर मान्यवर हया उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची प्रास्ताविक सौ, माया अरूण दमाहे सरपंच ग्राम पंचायत नगरधन यांनी केली. या कार्यक्रमामध्ये ग्रा. प कडून काही सास्कृतिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले. व लगेच आलेले मान्यवराचे महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. व लगेच वान वाटपाचे कार्यक्रम सुरुवात केली. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सन्मानीय सदस्या, उमेदचा सीआरपी सौ. सीमाताई बिरणवार, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, सर्व महिला बचत गटाच्या अध्यक्षा, महिला व गावकरी महिला मंडळी उपस्थित होते.